अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांचा 'बडे मियां छोटे मियां' (Bade Miyan Chhote Miyan) हा आगामी सिनेमा चर्चेत आहे. दोघांनी जॉर्डनमध्ये सिनेमाचं शूट पूर्ण केलं असून आता ते जोरजार प्रमोशन करत आहेत. नुकतंच सिनेमाचा प्रमोशनल इव्हेंट लखनऊमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी चाहत्यांची तुडुंब गर्दी बघता एकच गोंधळ उडाला. अक्षरश: पोलिसांना मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
लखनऊमध्ये 'खिलाडी' अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफने जबरदस्त एरियल एन्ट्री घेतली. यावेळी हजारो चाहत्यांची तुडुंब गर्दी जमली होती. अक्षरश: काही जवान सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी दोघांनी सिनेमातील एका गाण्यावर डान्सही केला. तसंच त्यांनी एकसारखाच पेहराव केला होता. अक्षय आणि टायगरची फॅन फॉलोइंग काही कमी नाही याचाच प्रत्यय या गर्दीवरुन पाहायला मिळतोय. दरम्यान गर्दीवर नियंत्रण नसल्याने पोलिसांना अक्षरश: काही जणांना हाकलवून लावावे लागले. तसंच एका व्हिडिओ प्रेक्षकांची चांगलीच पळापळ झाल्याचंही पाहायला मिळतंय. तर पोलिसही त्यांच्या मागे धावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या प्रमोशनल इव्हेंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले असतानाच सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. मात्र प्रेक्षकांना आवर घालण्यात पोलिसांच्या नाकीनऊ आल्याचं दिसतंय.
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. त्यांच्या 'बडे मियां छोटे मियां' सिनेमाची चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. 9 एप्रिल रोजी सिनेमा रिलीज होणार आहे. यामध्ये मानुषी छिल्लर, अलाया, सोनाक्षी सिन्हा यांचीही भूमिका आहे.