अभिनेता अक्षय कुमार तंबाखू कंपनीच्या जाहिरातीत दिसल्यानं चाहते खवळले आहेत. अक्षय कुमारचे जुने व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. 'मला अनेक तंबाखू कंपन्यांच्या ऑफर्स येतात. पण मी त्या स्वीकारत नाही. कारण आरोग्य महत्त्वाचं आहे,' असं म्हणणाऱ्या अक्षय कुमारचे जुने व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सबसे बडा रुपय्या म्हणत अनेकांनी अक्षयला ट्रोल केलं. यानंतर अक्षयनं माफीनामा सादर केला. मात्र चाहत्यांचा संताप कायम आहे. माफीनाम्यावरून अनेकांनी अक्षयला ट्रोल केलं आहे.
अक्षय कुमारनं विमलची जाहिरात केली. त्यावरून चाहते भडकले. सोशल मीडियावर अक्षयला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. यानंतर अक्षयनं माफी मागितली. जाहिरात करण्यासाठी मिळालेली फी चांगल्या कामांसाठी वापरेन, समाजसेवेसाठी पैशांचा वापर करेन, असं अक्षयनं म्हटलं. ब्रँडसोबतचा करार संपेपर्यंत जाहिरात टीव्हीवर दिसेल, असंदेखली अक्षय माफिनाम्यात म्हणाल्या. या दोन्ही गोष्टी चाहत्यांना खटकल्या.
तुम्ही करार रद्द का करत नाही? जाहिरात थांबवा असं ब्रँडला का सांगत नाही? फी परत का करत नाही? अशी प्रश्नांची सरबत्ती चाहत्यांनी केली आहे. बाप बडा ना भय्या, सबसे बडा रुपय्या, असा टोलादेखील चाहत्यांनी अक्षयला हाणला आहे. फी म्हणून मिळालेली रक्कम पीएम केअर्स फंडात टाकू नकोस, असा सल्लावजा टोमणादेखील काहींनी ऐकवला आहे. इतकंच वाईट वाटतंय, तर पैसे परत करून टाक आणि करार रद्द कर, अशी मागणी बहुतांश चाहत्यांनी केली आहे.