Join us

२०२५ मध्ये अक्षय कुमार ठरणार बॉक्स ऑफिसचा खिलाडी? हे बहुचर्चित सिनेमे होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 11:06 IST

२०२५ मध्ये अक्षय कुमारचे हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर येणार असून खिलाडी पुढील वर्ष गाजवणार यात शंका नाही

अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. अक्षयला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. २०२४ मध्ये अक्षयचे अनेक सिनेमे आले पण या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर हवी तशी चमक दाखवली नाही. त्यामुळे पुढील वर्षी अर्थात २०२५  मध्ये अक्षय कोणत्या सिनेमांमध्ये काम करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. २०२५ मधील अक्षयच्या सिनेमांकडे नजर टाकली तर पुढील वर्षात अक्षय बॉक्स ऑफिसचा खिलाडी ठरेल यात शंका नाही. एक नजर अक्षयच्या आगामी सिनेमांकडे...

२०२५ मधील अक्षयचे आगामी सिनेमे

१. स्काय फोर्स - अक्षयचा गेल्या अनेक दिवसांपासूनचा बहुचर्चित सिनेमा म्हणजे 'स्काय फोर्स'. हा सिनेमा २०२५ च्या जानेवारीत रिलीज होणार आहे. अक्षय या सिनेमात एअर फोर्स ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. २४ जानेवारी २०२५ ला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

२. जॉली एलएलबी ३- अक्षय कुमारचा २०२५ मधील हा आणखी एक सिनेमा. या सिनेमात अक्षयसोबत अर्शद वारसी झळकणार आहे. दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. १० एप्रिल २०२५ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

३. शंकरा- सत्य घटनेवर आधारीत अक्षय कुमारच्या 'शंकरा' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमात अक्षयसोबत अनन्या पांडे आणि आर.माधवन हे कलाकार झळकणार आहेत. सी. शंकरन नायर यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारीत आहे. १४ मार्चला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

४. हाउसफुल्ल ५- 'हाउसफुल्ल' या फ्रँचायजीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे या लोकप्रिय फ्रँचायजीचा पुढील भाग अर्थात 'हाउसफुल्ल ५' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या भागात अक्षय कुमार, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, संजय दत्त, अभिषेक बच्चन या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. ६ जून २०२५ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :अक्षय कुमारअर्शद वारसी