Join us

सत्ते पे सत्ताच्या रिमेकमध्ये बॉलिवूडमधील हा आघाडीचा अभिनेता साकारणार मुख्य भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 3:16 PM

रोहित शेट्टी आणि फराह खान हे बॉलीवूड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक मिळून सत्ते पे सत्ता या चित्रपटाचा रिमेक बनवणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. 

ठळक मुद्देसत्ते पे सत्ता या चित्रपटाच्या रिमेकमध्ये अक्षय कुमारची वर्णी लागली असल्याची बातमी जागरण या वेबसाईटने दिली आहे. त्यांनी त्यांच्या वृत्तात म्हटले आहे की, अक्षय कुमार सत्ते पे सत्ताच्या रिमेकमध्ये अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे

1982 साली प्रदर्शित झालेला सत्ते पे सत्ता हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, अमजद खान, शक्ती कपूर, सचिन पिळगांवकर, सारिका, सुधीर, कवलजीत सिंग यांच्या मुख्य भूमिका होत्या. रोहित शेट्टी आणि फराह खान हे बॉलीवूड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक मिळून या चित्रपटाचा रिमेक बनवणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. 

सत्ते पे सत्ता या चित्रपटाच्या रिमेकमध्ये अक्षय कुमारची वर्णी लागली असल्याची बातमी जागरण या वेबसाईटने दिली आहे. त्यांनी त्यांच्या वृत्तात म्हटले आहे की, अक्षय कुमार सत्ते पे सत्ता या चित्रपटाच्या रिमेकमध्ये अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. सध्या अक्षय आणि रोहित सूर्यवंशी या चित्रपटावर काम करत असून अक्षयने फराह खान सोबत तीस मार खाँ या चित्रपटात काम केले होते. तसेच हेमा मालिनी यांच्या भूमिकेसाठी दीपिका पादुकोणच्या नावाचा विचार करण्यात येत आहे. दीपिकाने फराहच्याच ओम शांती ओम या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती तर रोहित शेट्टी आणि दीपिकाने चेन्नई एक्सप्रेस हा हिट चित्रपट बॉलिवूडला दिला आहे. 

सत्ते पे सत्ता या चित्रपटाच्या रिमेकमध्ये अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी देखील दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. सत्ते पे सत्ता हा चित्रपट सेवन ब्राईड्स फॉर सेवन ब्रदर्स या इंग्रजी चित्रपटाचा रिमेक होता. अतिशय गलिच्छपणे आपले आयुष्य जगणाऱ्या सात भावांची कथा या चित्रपटात पाहायला मिळाली होती. या भावांमधील सगळ्यात मोठा भाऊ असलेल्या रवीच्या आयुष्यात इंदू येते. इंदू आणि रवीचे लग्न झाल्यानंतर इंदू या सगळ्या भावांमध्ये बदल घडवून आणते अशी या चित्रपटाची कथा होती. राज एन सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला त्यावेळी बॉक्स ऑफिसवर तितकेसे यश मिळाले नव्हते. पण नंतरच्या काळात छोट्या पडद्यावर या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती नोंदवली. या चित्रपटातील सगळीच गाणी आजही रसिकांच्या ओठावर रुळली आहेत.

टॅग्स :अक्षय कुमारअमिताभ बच्चनरोहित शेट्टीदीपिका पादुकोणफराह खान