अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'राम सेतु' चा मुहूर्त गुरुवारी अयोध्येत होणार आहे. सिनेमाचे 80 टक्के शूटिंग मुंबईत होणार आहे. अक्षय कुमार या प्रसंगी म्हणाले की, हा सिनेमा काल, आज आणि उद्या या तीन पिढ्यांमध्ये सेतु म्हणून काम करेल. सिनेमात विश्वास, विज्ञान आणि ऐतिहासिक वारसा तसेच भारतीयांच्या श्रद्धाची कथा दाखवण्यात येणार आहे. यात अक्षय कुमार भगवान राम यांची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा रामायण आणि भगवान राम यांच्या आदर्शांवर आधारित असणार आहे.
‘बच्चन पांडे’चे शूटिंग संपल्यानंतर अक्षय कुमार सध्या आपल्या कुटुंबासमवेत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेला होता. या व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. व्हॅकेशन संपवून लवकरच अक्षय कुमार 'राम सेतु' शूटिंगला सुरुवात करणार असल्याची माहिती आहे. सिनेमाचा पहिला शॉटचा मूहुर्त गुरुवारी 18 मार्चला उत्तर प्रदेशमधील धार्मिक शहर अयोध्येत होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करणार आहे. राम सेतु चित्रपटाची अरूण भाटिया आणि विक्रम मल्होत्रा सहनिर्मिती करत आहेत. क्रिएटिव्ह निर्माते डॉक्टर चंद्र प्रकाश द्विवेदी आहेत.या चित्रपटासाठी दीर्घ काळापासून अभिनेत्रींचा शोध सुरू होता. आता जॅकलिन आणि नुसरत यांची नावे निश्चित करण्यात आली आहे. या दोघींनाही चित्रपटासाठी साइन करण्यात आले आहे.