Akshay Kumar refuses to go on Kapil Sharma’s show: सिनेमा रिलीज होणार म्हटलं की, बडे बडे बॉलिवूड स्टार्स कॉमेडियन कपिल शर्माच्या (Kapil Sharma) ‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रमोशनसाठी हजेरी लावतात. अक्षय कुमार (Akshay Kumar) तर अगदी ठरलेला. पण आता अक्कीने म्हणे ‘बच्चन पांडे’च्या (Bachchan Pandey) प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharma Show) जाण्यास नकार दिला आहे. होय, चर्चा तर हीच आहे. अक्षय कुमार कपिल व त्याच्या टीमवर नाराज असल्याचं कळतंय. सोशल मीडियावर व्हायरल झालेली एक क्लिप या नाराजीचं कारण ठरल्याचीही चर्चा आहे.हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय व कपिल यांचं सध्या काहीतरी बिनसलं आहे. अक्षय म्हणे कपिलवर नाराज आहे. आता या नाराजीचं सविस्तर कारण काय तर एक क्लिप.
काय आहे नेमकं कारणतुम्हाला आठवत असेलच की ‘अतरंगी रे’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षय अलीकडे ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आला होता. यावेळी त्याने कपिलसोबत धम्माल मस्ती केली होती. मात्र या एपिसोडच्या शूटींगदरम्यान कपिलने अक्षयने पंतप्रधान मोदींच्या घेतलेल्या मुलाखतीचा अप्रत्यक्ष उल्लेख करत, त्यावरून विनोद केला होता. अक्षयने हा भाग एपिसोडमधून गाळण्याची विनंती केली होती. कारण यात पीएम आॅफिसचा उल्लेख केला होता. त्यावेळी चॅनलने त्याची ही विनंती मान्य केली होती. पण नंतर याची क्लिप सोशल मीडियावर लीक झाली आणि बघता बघता व्हायरल आली. यामुळे अक्षय कुमार नाराज झाल्याचे कळते. कपिलने आपल्या विश्वासाला तडा दिला, असं त्याचं मत झालं. अर्थात अद्याप या बातमीवर कपिल शर्माकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. याच नाराजीपोटी अक्षयने म्हणे ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येण्यास नकार दिला आहे. अक्षयचा ‘बच्चन पांडे’ हा सिनेमा येत्या 18 मार्चला चित्रपटगृहांत रिलीज होतोय.
‘बच्चन पांडे’ या चित्रपटांशिवाय येत्या काळात अक्षयचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. यात रामसेतू, रक्षाबंधन, पृथ्वीराज, सेल्फी और सिंड्रेला अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.