रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी चित्रपट रिलीजच्या आधीपासून खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप रिस्पॉन्स मिळतो आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुवांधार कमाई करत आहे. मात्र यादरम्यान चित्रपटातील काही सीन्सवर प्रेक्षकांनी आक्षेप घेत चित्रपट आणि रोहित शेट्टीला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.
एका युजरने ट्विट केेले की, सिंबामध्ये व्हिलनचा जो भाऊ बनला होता, तो सूर्यवंशीमध्ये अँटी टेररिझम स्क्वॉड ऑफिसर बनला आहे आणि हे बनवणार अॅवेजर्स सारखी युनिव्हर्स. यासोबतच लिहिले की, Rip लॉजिक.’
खरेतर सूर्यवंशी चित्रपटात अँटी टेररिझम स्क्वॉड ऑफिसरसारखे महत्त्वाचे आणि जबाबदारीवाले भूमिका साकारत आहे. तर त्याने रणवीर सिंगचा चित्रपट सिंबामध्ये व्हिलनची भूमिका साकारत असलेल्या सोनू सूदच्या भावाची भूमिका केली होती. चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की, एक व्यक्ती आधी व्हिलन बनला होता आणि दुसऱ्या चित्रपटात तो ऑफिसर का बनला.
चित्रपटातील आणखी एक सीन खूप ट्रोल होताना दिसत आहे. ज्यात अक्षय कुमार एका छप्परवरून खाली उडी मारताना दिसत आहे. हा सीन सलमान खानचा सिनेमा एक था टायगरचा कॉपी केल्याचे सांगितले जात आहे.