Join us

Akshaya Deodhar : पाठकबाईंचा संक्रांत लुक पाहिलात का ?काळ्या साडीत खुललं सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 11:40 AM

मकर संक्रांतीच्या निमित्ताने पाठकबाईंचा लुकही समोर आला आहे. काळ्या साडीत अक्षयाचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.

Akshaya Deodhar : मराठी अभिनेत्री अक्षया देवधर काही दिवसांपुर्वीच लग्नबंधनात अडकली. टीव्हीवरील लोकप्रिय जोडी पाठकबाई आणि राणादा खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकले. पुण्यात अगदी थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला. आता सणासुदीला सुरुवात झाली आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने पाठकबाईंचा लुकही समोर आला आहे. काळ्या साडीत अक्षयाचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.

अक्षयाने इन्स्टाग्रामवर रील व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने काळी साडी नेसली आहे तर साजेसे दागिने घातले. गळ्यात मंगळसूत्र आहे. नाकात नथ घातली आहे तर केसांचा अंबाडा करुन त्यावर गजरा देखील माळला आहे. तिचा हा लुक पाहून चाहतेही कमेंट करत आहेत. पाठकबाई खूपच सुंदर दिसत आहात अशा कमेंट्स तिच्या व्हिडिओवर येत आहेत. 

अक्षयाने व्हिडिओवर 'वेड' सिनेमातील लोकप्रिय गाणं लावलं आहे. 'सुख कळले' हे गाणं सध्या सर्वांचं आवडीचं आहे. याच गाण्यावर तिने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. अक्षयाच्या संक्रांतीचा लुक खूपच शोभून दिसतोय. तसेच लग्नानंतरची तिची ही पहिलीच मकर संक्रांत आहे त्यामुळे ती आणखी सजली आहे.

टॅग्स :मकर संक्रांतीअक्षया देवधरहार्दिक जोशी