Join us

'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षया नाईकने शेअर केली भावुक पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 20:15 IST

अक्षयाने सोशल मीडियावर एक खास पोस्टही शेअरे केली आहे. 

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. 'सुंदरा मनामध्ये भरली' या गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून अक्षया प्रेक्षकांच्या भेटीला आली.  या मालिकेत अक्षयाने लतिका ही भूमिका साकारली आहे. पाहता-पाहता ती तुफान लोकप्रिय झाली. या मालिकने अक्षयाला एक वेगळी ओळख मिळवून दिली. भरभरून प्रेम दिल्याबद्दल तिने चाहत्याचे आभार मानले आहेत. यासाठी तिने सोशल मीडियावर एक खास पोस्टही शेअरे केली आहे. 

अक्षयाने पोस्टमध्ये म्हटले की," आपण सुंदर आहोत, हे  मान्य करण्यासाठी ज्या मुलीला संघर्ष आणि धडपड करावा लागत होता. ती मुलगी आज ‘सुंदरा’ म्हणून ओळखली जाते. म्हणूनच लतिका माझ्या कायम जवळची असेल. लतिकाला भरभरुन प्रेम दिल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप आभार.”

अक्षयाने या पोस्टसह एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यावर अक्षयाने कुटुंबासह कशाप्रकारे आनंद साजरा केला होता, त्या दिवसाची आणि मालिकेचा शेवटचा भाग शूट झाला त्या दिवसाची एक छोटीशी झलक पाहायला मिळत आहे.  व्हिडीओमध्ये अक्षया म्हणते, “आता रस्त्याने जाताना  लहान मुलं, आजी-आजोबा अगदी सगळेच मला ‘सुंदरा’ या नावाने हाक मारतात. हे ऐकून खरंच खूप छान वाटतं.”

अक्षयाने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेव्यतिरिक्त तिने हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. परंतु, अभिनयाच्या क्षेत्रात पाय रोवत असतानाच तिने फूड इंडस्ट्रीमध्येही पदार्पण केलं आहे. अक्षयाचा स्वत:चा Culture Kitchen हा फूड स्टार्टअप बिझनेस आहे. तिच्या या व्यवसायामध्ये सौरभ परांजपे हा तिचा मित्रदेखील भागीदार आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनअक्षया नाईकमराठी अभिनेता