सर्व देशवासीयांचे लक्ष लागलेल्या चंद्रयान-३च्या प्रक्षेपणासाठी बाहुबली रॉकेट म्हणजेच लॉन्च व्हेईकल मार्क-३ (एलव्हीएम-३) आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा केंद्रावर सज्ज झाले आहे. दुपारी सुमारे 2.35 मिनिटांनी चंद्रयान 3 झेप घेणार आहे. जर ही लँडिंग यशस्वी झाली तर चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या अमेरिका, रशिया, चीन देशांमध्ये भारताचाही समावेश होईल. यासाठी सर्वचजण प्रार्थना करत आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीतूनही अनेक कलाकारांनी ट्वीट करत चंद्रयान 3 च्या यशासाठी प्रार्थना केली आहे.
सुनील शेट्टीने उत्साह व्यक्त करत लिहिले,'माझा उत्साह चंद्रावर पोहचत आहे. मी चंद्रयान 3 ला या मिशनसाठी व्हर्च्युअल शुभेच्छा देतो. भारतातील तंत्रज्ञानाला सर्वोच्च स्तरावर बघण्यासाठी मी अजून वाट पाहून शकत नाही. हा प्रवास सुखकर असू दे, नवा शोध शानदार असू दे आणि भारतासाठी हे यश अद्भूत असू दे'
तर दुसरीकडे अनुपम खेर यांनीही ट्वीट करत लिहिले,'चंद्रावर पोहोचण्यासाठी चांद्रयान २ सज्ज आहे. इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांना खूप खूप शुभेच्छा. झंडा ऊँचा रहे हमारा. जय हिंद!'
2019 साली 'चंद्रयान 2' चं यशस्वी लँडिंग झालं नव्हतं. त्याच ट्वीटला टॅग करत अक्षय कुमारने ट्वीट केले,' आणि ती वेळी आली आहे. चंद्रयान 3 साठी इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांना खूप खूप शुभेच्छा. लाखो लोक यासाठी प्रार्थना करत आहेत.'
चंद्रयान 3 चं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. 2.35 मिनिटांनी यान झेप घेईल आणि चंद्राच्या दिशेने उड्डाण करेल. प्रत्येक भारतीय या क्षणाची आतुरतेने वाट बघत आहे.