Join us

Ali Asgar : बाबा तुला दुसरं काही येत नाही का? मुलानं संतापून विचारलं आणि अली असगरने निर्णय घेतला...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 14:38 IST

Ali Asgar :  ‘कपिल शर्मा शो’मध्ये अलीने साकारलेली दादी ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली असती तरी याच व्यक्तिरेखेमुळे अलीच्या मुलांना प्रचंड त्रास दिला.

‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharma Show) दादीचं पात्र साकारून सर्वांना खळखळून हसवणारा अभिनेता अली असगर (Ali Asgar) याला आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत.  ‘ द कपिल शर्मा शो’ सोडल्यानंतर अली असगर ‘झलक दिखला जा 10’मध्ये (Jhalak Dikhhla Jaa 10) दिसला. अर्थात या शोमधील अलीचा प्रवास संपुष्टात आला आहे. पब्लिकनं कमी मतं दिल्यामुळे अली ‘झलक दिखला जा 10’मधून एलिमिनेट झाला. पण त्याआधी याच शोच्या सेटवर अली इमोशनल झालेला दिसला.  ‘द कपिल शर्मा शो’मध्ये अलीने साकारलेली दादी ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली असती तरी याच व्यक्तिरेखेमुळे अलीच्या मुलांना प्रचंड त्रास दिला.

 ‘झलक दिखला जा 10’मधून आऊट झाल्यावर अलीने हे दु:ख सर्वांसोबत शेअर केला. त्याने सांगितलं, ‘कॉमेडी शोमध्ये मी अनेक स्त्री पात्र साकारली. पण यामुळे माझ्या दोन्ही मुलांना खूप काही सोसावं लागलं. माझ्या मुलांना शाळेत सर्व चिडवायचे. माझी मुलं 4 थी, 5वीत असताना त्यांना माझ्यामुळे ट्रोल व्हावं लागलं. मी एकदा बसंती ही व्यक्तिरेखा साकारली होती. तेव्हा माझ्या मुलाला शाळेतल्या त्याच्या मित्रांनी प्रचंड त्रास दिला.  अरे याचा बाप बसंती आहे,याला दोन-दान आई आहेत, असं म्हणून ते त्याला चिडवायचे. एकदा शनिवारचा दिवस होता,आम्ही सगळे एकत्र डिनर करत होतो आणि टी.व्हीवर माझ्या एका शोची अनाउंसमेंट झाली. मी पुन्हा एका स्त्री पात्रात भेटायला येणार आहे, ते ऐकून माझा मुलगा ताडकन उभा राहिला आणि  तुम्हाला आणखी काही करता येत नाही का? असं त्याने मला संतापून विचारलं.  बाबा,तुम्हाला दुसरं काही करता येता नाही का? असं तो बिचारा लहान मुलगा मला म्हणाला.

तुमच्यामुळे मला शाळेत मुलं चिडवतात, हे त्याने त्यादिवशी सांगितलं.  त्यादिवशी मुलाच्या बोलण्याकडे मी दुर्लक्ष केलं. पुन्हा एकदा रविवारच्या दिवशी मी त्याला टीव्हीवर स्त्री पेहरावात दिसलो. तो काहीच न बोलता, न जेवता उठून निघून गेला.  त्याच्या त्या वागण्यानं मला विचार करायला भाग पाडलं आणि मी स्त्री व्यक्तिरेखा न करण्याचा निर्णय घेतला.  जेव्हा मी हा निर्णय घेतला तेव्हा विश्वास ठेवा माझ्याकडे काहीच काम नव्हतं. मी 9 महिने प्रत्येक प्रोजेक्टला फक्त नकार देत सुटलो. कारण मला फक्त स्त्री व्यक्तिरेखा ऑफर केल्या जायच्या, मी एक अभिनेता आहे. मी फीमेल पात्र रंगवतो आणि मी इतरही अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. पण जेव्हा मी कॉमेडीच्या दुनियेत पहिलं पाऊल ठेवलं ,तेव्हा मला स्त्री पात्रच ऑफर केली गेली. मला त्यावरनं ट्रोलही केलं गेलं. माझ्याविषयी खूप उलट-सुलट लिहिलं गेलं. नामर्द आहे,बेशरम आहे. काय काय म्हणायचे लोक. मी नेहमी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. ‘झलक दिखला जा’ सारखा वेगळा शो करुन छान वाटलं. मी मिस करीन हा मंच...’

टॅग्स :अली असगरटेलिव्हिजनद कपिल शर्मा शो