बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhat) यांच्या लग्नाला आज १ वर्ष पूर्ण झालं. यानिमित्ताने त्यांच्यावर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षांव होतोय. आलियाने रणबीरसोबतचे कधीही पोस्ट न केलेले फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये तिच्या हळदीचा आणि ट्रीपचा फोटो आहे. फोटोवर नेहा धुपियाच्या कमेंटने लक्ष वेधून घेतलंय. काय कमेंट आहे अशी?
आलियाने इन्स्टाग्रामवर तिचा आणि रणबीरचा हळदीचा फोटो पोस्ट केला. यानंतर रणबीरने तिला प्रपोज केलं तो क्षण तिने पोस्ट केला आणि आणखी एक रोमँटिक फोटो पोस्ट केला. यावर मनोरंजनविश्वातील कलाकारांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. दोघांना भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. तर अभिनेत्री नेहा धुपियाने कमेंट करत लिहिले, 'रणबीर, आलिया राहा..सोबत हार्ट इमोजी' अशी कमेंट केली आहे. याचाच अर्थ असा की लग्नाच्या वेळी आलिया भट गरोदर होती म्हणूनच नेहाने राहाचेही नाव कमेंटमध्ये लिहिले आहे.
आलिया भट एकीकडे यशाच्या शिखरावर होती. तिचे एकामागोमाग एक चित्रपट हिट ठरत होते. तसंच वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं तर ती रणबीरसोबत लिव्ह इन मध्येही राहत होती. या सगळ्यात अचानक त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि 14 एप्रिल 2022 रोजी दोघांनी मुंबईत घरीच लग्न केले. त्यानंतर लगेच नोव्हेंबरमध्ये आलियाने मुलीला जन्म दिला. या दरम्यान आलियाचा डार्लिंग, तसंच ब्रह्मास्त्र हा सिनेमाही रिलीज झाला. प्रेग्नंसीच्या काळात आलियाने दोन्ही सिनेमांचं प्रमोशन केलं. इतकंच नाही तर तिने गॅल गॅडोट सह हॉलिवूड सिनेमाचंही चित्रीकरण याचदरम्यान केलं.