Join us

एका वर्षात चार-चार 'ब्लॉकबस्टर'; बॉलिवूडमध्ये चौघींनी केलीय आलियासारखी किमया, बघा कोण आहेत त्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 11:50 AM

आलियाने यावर्षात बॅक टू बॅक चार सिनेमे हिट दिलेत. पण आलियाच्या आधी या अभिनेत्रींनी देखील एका वर्षात हिट सिनेमे दिलेत..

आलिया भटने बॉलिवूडमध्ये दहा वर्षे झाली आहेत, आणि आता ती सर्वात जास्त मानधन घेत असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 2012 मधील स्टुडंट ऑफ द इयर या तिच्या पहिल्या चित्रपटात ओव्हर-द-टॉप शनायाची भूमिका करण्यापासून, आलियाने डिअर जिंदगी आणि राजी यासह हार्ड हिटिंग चित्रपटांमध्ये जबरदस्त कामगिरी करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

तथापि, 2022 हे आलियासाठी पर्सनल आणि प्रोफेशनल अशा दोन्ही पातळ्यांवर सर्वोत्तम वर्ष ठरले आहे. या वर्षी रिलीज झालेल्या आलियाचे चित्रपट हिट झाले. एप्रिलमध्ये आलियाने रणबीर कपूरसोबत लग्न केले. लवकरच आलिया आणि रणबीर आई-बाबा होणार आहेत. 

यावर्षीच्या हिटची सुरुवात २०२२च्या संजय लीला भन्साळींच्या गंगूबाई काठियावाडीने केली आणि नंतर ती SS राजामौलींच्या RRR, Netflixवर आलेला डार्लिंग्स आणि अयान मुखर्जीच्या अलीकडील रिलीज झालेल्या ब्रह्मास्त्र. एकाच वर्षात अनेक हिट्स देणारी ती पहिली अभिनेत्रींना नाही. आलियाच्या आधीही अनेक अभिनेत्रींनी एका वर्षांत हिट सिनेमा दिलंत. 

दीपिका पादुकोण आलियाच्या नऊ वर्षांपूर्वी, दीपिकाने 2013 मध्ये चार जबरदस्त बॅक-टू-बॅक हिट्स दिले आणि बॉक्स ऑफिस क्वीन म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं होतं. 

अब्बास-मस्तानचा रेस 2 हे तिचे त्या वर्षातील पहिला हिट ठरला होता. अयान मुखर्जीचा ये जवानी है दिवानी, रोहित शेट्टीचा चेन्नई एक्सप्रेस, आणि संजय लीला भन्साळी यांच्या गोलियों की रासलीला राम-लीला 2013 चा सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटांमुळे दीपिका पादुकोणचं करिअर एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. 

कतरिना कैफ 2003 मध्ये 'बूम'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. कतरिनाने 2007 मध्ये चार बॅक टू बॅक हिट्स दिले. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. विपुल अमृतलाल शाह यांचा नमस्ते लंडन हा चित्रपट अभिनेत्रीच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. तिच्या अभिनयासाठी तिला चांगली समीक्षा मिळाली  आणि हा चित्रपट ही बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. यानंतर अपने, पार्टनर हे चित्रपटदेखील हिट ठरले  आणि वेलकम चित्रपटाने वर्षाचा शेवट चांगला झाला.

काजोल90 च्या दशकातील यशस्वी अभिनेत्री म्हणून काजोलकडे पाहिलं जातं. काजोल आजही खूप सक्रिय आहे आणि तिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिने तीन दशकांहून अधिक काळातील तिच्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले. 1998 हे अभिनेत्रीसाठी प्यार किया तो डरना क्या, प्यार तो होना ही था आणि कुछ कुछ होता है या चित्रपटांच्या यशाने उत्तम वर्ष ठरले. त्याच वर्षी, काजोलची 'दुश्मन'मधील तिच्या अभिनयाची समीक्षकांनी ही प्रशंसा केली.  तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ही  बजेटपेक्षा जास्त कमाई केली. 

श्रीदेवीबॉलिवूडची 'पहिली महिला सुपरस्टार' म्हणून  दिवंगत श्रीदेवी यांना ओळखलं जातं. अनेक हिट चित्रपटांसाठी आणि त्यांच्या अभिनयासाठी त्या कायम  लक्षात राहतील. 1989 मध्ये, तिने एकूण सात चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यातीस गुरू, गैर कानून, चांदनी आणि चालबाज असे चार हिट चित्रपट झाले.

 

टॅग्स :आलिया भटकतरिना कैफदीपिका पादुकोणकाजोल