Join us

Alia Bhatt : ही मुलगी कसली जादूई आहे..., आई झाल्यानंतर आलियाची पहिली पोस्ट, शेअर केला खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 2:56 PM

Alia Bhatt and Ranbir Kapoor welcome their 1st child : रणबीर कपूर आणि आलिया भट आईबाबा झाले आहेत. सध्या आलिया व रणबीरवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. चाहत्यांनी कपलला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Alia bhat Ranbir Kapoor welcomes a baby girl : रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt)आईबाबा झाले आहेत. काही तासांआधी आलियाने एका गोंडस कन्येला जन्म दिला आणि कपूर कुटुंबांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सध्या आलिया व रणबीरवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. चाहत्यांनी कपलला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.आलियाने आपल्या राजकन्येच्या जन्माची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. आलियाच्या वतीने तिच्या टीमने एक खास फोटो पोस्ट केला आहे. ‘आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची बातमी. आमच्या बाळाचा जन्म झाला आणि ही मुलगी कसली जादुई आहे.... आज आम्ही भरभरून प्रेम, आशीर्वाद मिळालेले पालक आहोत. खूप खूप प्रेम...’, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आजी नीतू कपूर यांनी दिले आशीर्वादघरात राजकन्येचा जन्म होताच आजी नीतू कपूर यांनीही आनंद व्यक्त केला. आलियाने शेअर केलेली नीतू यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर रिपोस्ट केली आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी ‘आशीर्वाद’ असं कॅप्शन दिलं आहे. रणबीरची बहिण रिद्धिमा कपूर हिनेही आत्त्या झाल्याच्या आनंदात एक खास पोस्ट शेअर करत आपल्या भाऊ व वहिनीचं अभिनंदन केलं आहे. भट कुटुंबातही आनंदाला उधाण आलं आहे. आलियाची आई व बाबा महेश भट दोघंही लेकीच्या प्रसूतीवेळी रूग्णालयात हजर होते.  

आलिया 20 ते 30 नोव्हेंबरदरम्यान बाळाला जन्म देऊ शकते, असं म्हटलं जात होतं. पण प्रत्यक्षात आज सकाळी 7.30 च्या सुमारास आलिया प्रसूतीसाठी रूग्णालयात दाखल झाली. यावेळी रणबीर कपूर तिच्यासोबत होता. रूग्णालयात दाखल झाल्यानंतर काही तासांतच आलियाने मुलीला जन्म दिला.

आलिया व रणबीरने याचवर्षी एप्रिल महिन्यात लग्न केलं. अगदी मोजक्या कौटुंबिक सदस्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नाची जोरदार चर्चा झाली. लग्नानंतर उण्यापुऱ्या दोनच महिल्यात या जोडप्यानं गुडन्यूज शेअर केली होती. जूनमध्ये आलियाने सोनोग्राफी रुममधून एक फोटो शेअर करत आपण आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती. त्यामुळे आलिया लग्नाआधीच प्रेग्नंट होती, अशी चर्चा सुरू झाली होती. 

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर