आलिया भट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून इंडस्ट्रीत रंगली आहे. मुकेश अंबानींच्या घरी गणपतीला दोघे एकत्र स्पॉट झाले. दोघे एकत्र खूपच सुंदर दिसत होते. अमर उजालाच्या रिपोर्टनुसार सध्या या जोडीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात रणबीर आणि आलियाच्या लग्नाचा फोटो दिसतोय. आलिया आणि रणबीरने एकमेकांच्या गळ्यात हार घालताना दिसतेय. असे गोंधळून जाऊ नका.
कारण आलियाने नुकतेच एक अॅड शूट केले आहे. एक प्रसिद्ध ब्राँडसाठी आलिया वधूच्या गेटमध्ये तयार झाली. आलिया आणि रणबीरटचे हे फोटो शूट एडिट करण्यात आले आहे. मॉडलच्या ठिकाणी रणबीरचा चेहरा लावण्यात आला. सध्या आलिया आणि रणबीरचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतायेत.