Join us

आलिया भट-रणबीर कपूर करणार का डिसेंबरमध्ये लग्न ? आलियाने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 6:36 PM

आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चर्चा सुरू असताना आता आलियाने पहिल्यांदाच त्यांच्या लग्नाच्या चर्चांविषयी आपले मत व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देआलियाने सांगितले आहे की, सध्या कोण नको त्या अफवा पसरवत आहे तेच मला कळत नाहीये. प्रत्येक तीन आठवड्यांनंतर मला माझ्या लग्नाची नवीन तारीख आणि ठिकाण ऐकायला मिळत आहे. खरे सांगू तर या गोष्टी मी आता एन्जॉय करायला लागले आहे.

आलिया भट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा आहे. 2020 डिसेंबर मध्ये आलिया आणि रणबीर लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. त्या दोघांची मुख्य भूमिका असलेला ब्रम्हास्त्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ते दोघे लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. आलिया आणि रणबीर डेस्टिनेशन वेडिंग प्लान करत आहेत आणि यासाठी त्यांनी विदेशाची नव्हे तर भारताचे नंदनवन अर्थात काश्मीरची निवड केली असल्याची देखील गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. पण या दोघांनीही यावर मौन राखणेच पसंत केले आहे. 

आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चर्चा सुरू असताना आता आलियाने पहिल्यांदाच त्यांच्या लग्नाच्या चर्चांविषयी मीडियाशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे. झुम वाहिनीशी आलियाने बोलताना सांगितले आहे की, सध्या कोण नको त्या अफवा पसरवत आहे तेच मला कळत नाहीये. प्रत्येक तीन आठवड्यांनंतर मला माझ्या लग्नाची नवीन तारीख आणि ठिकाण ऐकायला मिळत आहे. खरे सांगू तर या गोष्टी मी आता एन्जॉय करायला लागले आहे. या बातम्यांमुळे माझे आता मनोरंजन होते एवढेच मी सांगेन. 

ब्रम्हास्त्र या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी आलिया आणि रणबीर यांच्या नात्याला सुरुवात झाली असे म्हटले जाते. त्या दोघांना गेल्या अनेक महिन्यांपासून विविध सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र पाहाण्यात येते. तसेच रणबीरच्या कुटुंबासोबत देखील आलिया अनेकवेळा दिसते. त्यामुळे आलिया आणि रणबीर यांच्या नात्याला त्यांच्या कुटुंबियांनी देखील होकार दिला असून ते लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा रंगली आहे. 

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर