बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेलं आणि बहुप्रतिक्षीत ठरलेलं रणबीर आणि आलिया या जोडीचं अखेर काल (१४ एप्रिल) मोठ्या थाटात लग्न पार पडलं. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगलेला हा लग्नसोहळा विविध कारणांसाठी चर्चेत राहिला. यात अगदी लग्नातील रितीरिवाजांपासून ते उपस्थितांच्या पेहरावांपर्यंत प्रत्येक गोष्ट खास असल्याचं पाहायला मिळालं. यामध्येच आता आलियाच्या लग्नानंतर सोनी राजदान यांनी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.
सध्या सोशल मीडियावर रणबीर आणि आलिया यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यात त्यांच्या जवळच्या व्यक्तींसह कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी या जोडीचे फोटो शेअर करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याध्येच आलियाची आई सोनी राजदान यांनी आपल्या लेकीसाठी आणि जावयासाठी पोस्ट शेअर केली आहे.
आलिया झाली रणबीरची 'दुल्हनिया'; पाहा त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे खास Photos
''जेव्हा आपण मुलगी गमावतो, त्याचवेळी एक मुलगाही आपल्याला भेटतो..मी तर म्हणते, आम्ही आमच्या कुटुंबात आमच्या मुलाचं स्वागत केलं आहे. आमचं कुटुंब. माझी प्रेमळ सुंदर बेबी गर्ल कायम अशीच सोबत राहू दे. दोघांनाही लग्नाच्या खूप शुभेच्छा'', अशी पोस्ट सोनी राजदान यांनी लिहिली आहे.
दरम्यान, या पोस्टवरुन त्यांनी रणबीरला जावई न मानता त्याला आपला लेक म्हणून स्वीकारलं आहे. त्यामुळे सध्या त्यांची ही पोस्ट चर्चेत येत आहे. रणबीर आणि आलिया यांनी जवळपास ५ वर्ष एकमेकांना डेट केलं. त्यानंतर कुटुंबाच्या संमतीने या दोघांनी लग्नगाठ बांधली.