Join us

कलाकारांना तातडीने कोरोना लस द्या...! म्हणून आलियाची आई सोनी राजदानने केली ही मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 12:21 PM

आलियाची आई व अभिनेत्री सोनी राजदान यांनी कोरोना लसीबद्दल ट्वीट केले आहे. त्यांचे  हे ट्वीट चांगलेच चर्चेत आहे.

ठळक मुद्देमंडी, सारांश, खामोश, डॅडी, सर, पेज 3, राझी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये  नी राजदान यांनी आजवर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी सरकारने लसीकरणाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. अशात आलियाची आई व अभिनेत्री सोनी राजदान यांनी कोरोना लसीबद्दल ट्वीट केले आहे. त्यांचे  हे ट्वीट चांगलेच चर्चेत आहे.बिझनेसमॅन सुहैल सेठ यांच्या पोस्टला रिप्लाय करताना सोनी यांनी फिल्मी कलाकारांना तातडीने लस देण्याची विनंती केली आहे.

‘सरकारने कलाकारांना तातडीने लस द्यायला हवी. कारण कलाकार मास्क घालू शकत नाहीत. हे काम नाही, पेशा आहे. दुसरे लोक स्वत:ची सुरक्षा करू शकतात. पण फक्त कलाकार स्वत:ची सुरक्षा करू शकत नाही,’ असे सोनी यांनी लिहिले.

अन्य एका ट्वीट मध्ये त्यांनी लिहिले, ‘प्रत्येक कलाकार मोठा सुपरस्टार नसतो. त्यामुळे जे लोक तक्रार करतात, त्यांनी आपले तोंड बंद ठेवावे. अशा लोकांनी कंटेन्ट पाहणे बंद करावे. हा कंटेन्ट कलाकारांचा जीव धोक्यात घालून बनतो. कलाकार नेहमीच जोखीम पत्करून काम करतात.’ सोनी राजदान यांचे हे ट्वीट सध्या वेगाने व्हायरल होतेय.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर सोनी राजदान नेपोटिजमच्या मुद्यावरून प्रचंड ट्रोल झाल्या होत्या. यानंतर त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरचे कमेंट सेक्शन बंद केले होते.  मंडी, सारांश, खामोश, डॅडी, सर, पेज 3, राझी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये  नी राजदान यांनी आजवर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रात देखील त्यांनी आपले भाग्य आजमावले आहे. त्यांनी नजर, लव्ह अफेअर यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.1986 मध्ये सोनी राजदान यांनी महेश भट यांच्यासोबत लग्न केले. ते प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पूजा भट, आलिया भट या त्यांच्या मुलींनी देखील बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण केले आहे. आलिया ही सोनी आणि महेश यांची मुलगी आहे. आज आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. 

टॅग्स :आलिया भट