Join us

ब्रह्मास्त्रचा बिझनेस पाहून आलिया खूश, बॉयकॉट ट्रेंडला प्रत्यु्त्तर देत म्हणाली, 'जो बॉक्स ऑफिस में आग लगाई है...',

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 11:40 AM

बॉलिवूडसाठी वरदान ठरलेल्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. ब्रह्मास्त्रच्या यशावर आलिया भटनं प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूडसाठी वरदान ठरलेल्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपट बॉयकॉट करण्याचा ट्रेंड झाला पण याचा परिणाम 'ब्रह्मास्त्र'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाला नाही.  चित्रपटाच्या यशाने संपूर्ण स्टारकास्ट आणि निर्माते खूप खूश आहेत. आता ब्रह्मास्त्रच्या यशावर आलिया भटनं प्रतिक्रिया दिली आहे.

ब्रह्मास्त्रच्या यशावर काय बोली आलिया ?रणबीर कपूर, आलिया भट आणि अयान मुखर्जी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अहमदाबादला गेले होते. येथे तिघांनीही चाहत्यांशी आणि मीडियाशी चित्रपटाविषयी चर्चा केली. आलिया भटला ब्रह्मास्त्र चित्रपटाबाबत केलेल्या नकारात्मक कमेंटवर प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर अभिनेत्री म्हणाली - आपल्याकडे एकच आयुष्य असतं आणि त्यात दोन पर्याय असतात. एकतर आपण सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो.  टीका, समीक्षा, प्रतिक्रिया हा प्रेक्षकांचा हक्क आहे. आम्ही नकारात्मकपेक्षा सकारात्मक गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो.

7 दिवसांत ब्रह्मास्त्राची जोरदार कमाईचित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्याला मिळणारा प्रतिसाद हा सकारात्मक आहे. नाहीतर बॉक्स ऑफिसवर जी आग लावली आहे ती लागली नसती. ब्रह्मास्त्रने 7 दिवसात जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटाने एका आठवड्यात 173.20 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या वीकेंडमध्ये ब्रह्मास्त्रकडून अधिक मजबूत कमाईची अपेक्षा आहे. वीकेंडपर्यंत चित्रपटाने 200 कोटींचा गल्ला जमवण्याचा अंदाज आहे. बॉलिवूडला बॉक्स ऑफिसवर बराच काळानं हिट चित्रपट मिळाला आहे. ब्रह्मास्त्रच्या केवळ हिंदी व्हर्जननेच नव्हे तर साऊथमध्ये ही सुसाट सुरु आहे. 

दिग्दर्शक अयान मुखर्जी ब्रह्मास्त्र तीन भागात आणणार आहे. हा एक ट्रिलॉजी चित्रपट आहे, ज्याचा दुसरा भाग २०२५ पर्यंत आणला जाणार आहे. आता हा फोटो पाहून आता चाहत्यांचे म्हणणे आहे की, ब्रह्मास्त्रच्या तिन्ही भागांची स्टारकास्ट दाखवणारा हा फोटो आहे.

टॅग्स :ब्रह्मास्त्रआलिया भटरणबीर कपूर