आलिया भट (Alia Bhatt) बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. अगदी विशीत असल्यापासूनच तिने अभिनयाला सुरुवात केली. एकापेक्षा एक हिट सिनेमेही दिले. दोन वर्षांपूर्वी अभिनेत्रीने रणबीर कपूरसोबत लग्नगाठही बांधली. त्यांना राहा ही क्युट मुलगी झाली जी आता दीड वर्षांची आहे. राहा नंतर आलियाने नुकतंच दुसऱ्या प्रेग्नंसीवर भाष्य केलं आहे.
'आयएमडीबी'शी केलेल्या चॅटमध्ये आलियाने तिच्या एकंदर प्रवासाचे वर्णन केले. यावेळी तिला तिच्या भविष्यातील प्लॅनिंगविषयी विचारण्यात आले. यावर आलिया म्हणाली, "खूपच खोल प्रश्न आहे. मी खूप सिनेमे करेन अशी आशा आहे. फक्त अभिनेत्री म्हणून नाही तर निर्माती म्हणूनही मला बरेच चित्रपट करायचे आहेत. आणखी मुलं हवी आहेत. खूप फिरायचं आहे. निरोगी, आनंदी, साधं, शांत, निसर्गाच्या सान्निध्यात आयुष्य हवं आहे."
आलियाच्या उत्तरावर सर्वांचं लक्ष एका वाक्याने वेधलं हवं आहे. ते म्हणजे आणखी मुलं हवी आहेत. म्हणजेच भविष्यात आलियाची पुन्हा आई व्हायची इच्छा नक्कीच आहे असं दिसतंय. लेक राहा सध्या दीडच वर्षाची आहे. तिच्या क्युटलूक्सने सर्वांनाच प्रेमात पाडलं आहे. अनेकांना तिच्यात ऋषी कपूर यांचीच झलक दिसते.
आलिया भटचा 'जिगरा' सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. तिने या सिनेमाची निर्मितीही केली आहे. भावा बहिणीच्या नात्यावर आधारित या सिनेमाची सध्या चर्चा आहे.