आलिया भट आणि रणबीर कपूर सध्या आपल्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेच आहे. सध्या ते 'वाराणसी'मध्ये आगामी सिनेमा 'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. मात्र स्पॉट बॉयच्या रिपोर्टनुसार शूटिंग संपण्याच्या तीन दिवस आधी दोघे मुंबईत परतले आहेत. दोघांना एकत्र एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार आलियाची तब्येत बिघडल्याने रणबीर तिला घेऊन मुंबईत परतला आहे.
बनारसमध्ये रणबीर आणि आलिया 'ब्रह्मास्त्र'ची शूटिंग करत होते त्याच दरम्यान अचानक आलियाची तब्येत बिघडली. त्यामुळे रॅपअपच्या तीन दिवस आधीच रणवीर तिला घेऊन मुंबईत परतला. आलिया काहीकाळ आराम करुन उरलेले शूटिंग पूर्ण करणार आहे. रिपोर्टनुसार आलिया-रणबीर तीन दिवसांमध्ये एका गाण्याचे शूटिंग करणार होते.
मात्र आता हे गाणं नोव्हेंबरमध्ये शूट करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार तब्येत बिघडल्यानंतर ही आलिया शूटिंग करत होती. मात्र दिग्दर्शक अयान मुखर्जीने आलियाच्या बिघडलेल्या तब्येतीकडे बघत शूटिंग बंद करण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबरमध्ये संपूर्ण टीम पुन्हा एकदा वाराणसीमध्ये जाऊन गाणं शूट करणार आहे.