Join us

Alia Bhatt-Ranbir Kapoor Marriage Date Confirm: अखेर ठरलं! 'या' दिवशी आलिया भट्ट-रणबीर कपूर घेणार सात फेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 21:23 IST

Alia Bhatt-Ranbir Kapoor Marriage Date Confirm: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) विवाहबंधनात अडकणार आहेत.

Alia Bhatt-Ranbir Kapoor Marriage Date Confirm: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या विवाहाची तारीखही निश्चित झाली आहे. आलीय भट्टचे काका रॉबिन भट्ट यांनी लग्नाच्या तारखांची पुष्टी केली आहे. १३ तारखेला मेहंदी आणि १४ तारखेला विवाहसोहळा पार पडणार आहे अशी माहिती तिच्या काकांनी दिली. यानंचर आलिया आणि रणबीर कपूर यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

रॉबिन भट्ट यांनी आज तकशी साधलेल्या विशेष संवाददरम्यान आलिया रणबीर यांच्या विवाह सोहळ्याच्या तारखेबद्दल माहिती दिली. "१३ तारखेला मेहंदी आहे आणि १४ तारखेला विवाहसोहळा पार पडणार आहे," असं त्यांनी सांगितलं. यापूर्वी रॉबिन भट्ट यांनी हा कार्यक्रम चार दिवस चालणार असल्याचं म्हटलं होतं.

"तुम्ही माझ्यावर आता भरवसा करा किंवा मी जे पहिले बोलले त्यावर भरवसा कराय १५ आणि १६ तारखेला तारखेला काहीही नाही. विवाहाचे हे दोन दिवस नक्की आहेत आणि ऑफिशियल फंक्शन्स याच दोन दिवसांत आहेत. त्यानंतर लोक पार्टी करतील," असंही ते म्हणाले. "मी इन्वायटिंग कमिटीचा भाग नाही, त्यामुळे या लग्नात कोण येणार याची मला माहिती नाही," असंही त्यांनी सांगितलं. सध्या आपल्याला लग्नाचं कार्ड मिळालं नसून आपल्याला फोनवर याची माहिती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भट