Join us

VIDEO: रणबीर व आलियाचा रिसेप्शनचा काहीही प्लान नाही, हे आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 12:19 PM

Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding : आलिया भट व रणबीर कपूर अखेर लग्नबंधनात अडकले. काल 14 एप्रिलला दोघांनीही वास्तू अपार्टमेंटमध्ये लग्नाच्या आणाभाका घेतल्या. आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती या लाडक्या कपलच्या रिसेप्शनची. पण...

Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding : आलिया भट (Alia Bhatt) व रणबीर कपूर (Ranbir Kapoor)अखेर लग्नबंधनात अडकले. काल 14 एप्रिलला दोघांनीही वास्तू अपार्टमेंटमध्ये लग्नाच्या आणाभाका घेतल्या. आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती या लाडक्या कपलच्या रिसेप्शनची. आलिया व रणबीरच्या लग्नाचं रिसेप्शन कधी होणार? कुठे होणार? या रिसेप्शनला कोण कोण येणार? असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. लग्नानंतर कपल आर के बंगल्यात एक ग्रँड रिसेप्शन देणार आणि या रिसेप्शनला बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज येणार, अशी चर्चा होती. पण आता या चर्चांवर पूर्णविराम लागला आहे. होय, खुद्द नीतू कपूर यांनी रणबीर व आलियाचं वेडिंग रिसेप्शन होणार नसल्याचं कन्फर्म केलं आहे. (Alia Bhatt Ranbir Kapoor No Reception) 

लेकाच्या लग्नानंतर नीतू मीडियासमोर आल्यात. यावेळी त्यांची लेक रिद्धिमा ही सुद्धा त्यांच्यासोबत होती. यावेळी मीडियाने नीतू यांनी रिसेप्शनचा प्लान विचारला. यावर, ‘अब सब हो गया है... आप सब सो जाइए अब कुछ नहीं है,’ असं नीतू मीडियाला उद्देशून म्हणाल्या. याचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे.

रणबीर कपूर खूप जास्त प्रायव्हेट पर्सन आहे. त्याला मुळातच लग्नाचा गाजावाजा नको होतं. त्यामुळे अतिशय मोजक्या व जवळच्या लोकांच्या उपस्थितीत रणबीर व आलियानं लग्नगाठ बांधली. आता त्याला रिसेप्शनही नकोय. आता आपल्या पत्नीसोबत अधिकाधिक वेळ घालवण्याचा त्याचा इरादा आहे.आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची लग्नाची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. आलियानं सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांची इच्छा पूर्ण केली आहे.आलियानं लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने ऑफ व्हाईट रंगाचा घागरा तर रणबीरनं देखील त्यालाच मॅच होणारी ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी घातली आहे. 

आलियाचा हातातील लाल चुडा हिऱ्यांची ज्वेलरी तिच्या सुंदरतेत भर टाकत आहे.दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नाही.चाहत्यांकडून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :रणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठरणबीर कपूरआलिया भटनितू सिंग