Join us

Tu Jhoothi Main Makkaar trailer : रणबीर कपूरच्या ‘तू झूठी मैं मक्कार’च्या ट्रेलरवर आलिया भट्टचे फक्त तीनच शब्द...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 6:32 PM

Tu Jhoothi Main Makkaar trailer : सध्या या चित्रपटाच्या ट्रेलरची जोरदार चर्चा आहे. नेटकरीही हा ट्रेलर पाहून क्रेझी झाले आहेत. रणबीरची बायको आलियाची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. 

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhoothi Main Makkaar trailer) या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाये आणि सध्या याच ट्रेलरची चर्चा आहे. ट्रेलर एकदम झक्कास आहे.  ३ मिनिटे २५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये रणबीर कपूर हा श्रद्धा कपूरच्या प्रेमात पडल्याचे दिसताे.  श्रद्धा देखील प्रेमाची कबूली देते. मात्र काही दिवसांनंतर श्रद्धा आपल्याला फसवत आहे याची जाणीव रणबीरला होते. त्यानंतर चित्रपटाची कथा अचानक वेगळं वळण घेते. आता कथेत पुढे काय होतं, हे तर चित्रपट रिलीज झाल्यानंतरच कळेल. पण सध्या या चित्रपटाच्या ट्रेलरची जोरदार चर्चा आहे. नेटकरीही हा ट्रेलर पाहून क्रेझी झाले आहेत.

रणबीरची बायको आलियाची  (Alia Bhatt ) अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही.  श्रद्धा व रणबीरच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ ट्रेलरवर आलियानं मोजक्या तीन शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.   

इन्स्टाग्राम स्टोरीवर तिने चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक शेअर केली आहे. कॅन नाॅट वेट... चित्रपट पाहण्यासाठी वाट बघू शकत नाही, असं कॅप्शन आलियाने या पोस्टला दिलंय.  रणबीर-श्रद्धाचा हा चित्रपट ८ मार्च २०२३ म्हणजेच होळीच्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजनने केले आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. 

ट्रेलरला तुफान प्रतिसाद‘तू झूठी मैं मक्कार’च्या ट्रेलरला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळतोय. ट्रेलर बघून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.आजकल रिलेशनशिप में घुसना आसान है, उसमे से निकलना मुश्किल, या रणबीरच्या वाक्याने ट्रेलरची सुरूवात होते. यानंतर श्रद्धा कपूरची एन्ट्री होते आणि मग ट्रेलर खिळवून ठेवतो. रणबीर व श्रद्धाची नवीकोरी जोडी पाहताना मज्जा येते. दोघांचे किसींग सीनही यात दिसतात. ट्रेलरच्या सुरूवातीलाच एक किसींग सीन येतो. मग एक... दोन...असे किसींग सीन्स दिसतात.  

टॅग्स :आलिया भटश्रद्धा कपूररणबीर कपूर