Join us
Daily Top 2Weekly Top 5

फोटोग्राफरच्या प्रश्नाला आलिया भट्टने दिलं तावातावाने उत्तर, कॅमेरात कैद झाला नजारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 15:31 IST

Alia Bhatt : आलियाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात बघू शकता की, एक फोटोग्राफर आलिया एक प्रश्न विचारतो, जो ऐकून ती संतापते.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) बुधवारी ग्लॅमरस अंदाजात '83' सिनेमाच्या प्रीमिअरला गेली होती. या प्रीमिअर शोला बॉलिवूडमधील अनेक कलाकार आले होते. अशात आलियाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात बघू शकता की, एक फोटोग्राफर आलिया एक प्रश्न विचारतो, जो ऐकून ती संतापते.

व्हिडीओत आलिया भट्ट ब्लॅक अॅन्ड व्हाइट ड्रेसमध्ये फारच स्टायलिश आणि सुंदर दिसत आहे. ती ब्रम्हास्त्र सिनेमाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीसोबत प्रीमिअरला आली होती. परत जात असताना एक फोटोग्राफर तिला '83' सिनेमातील फेवरेट सीन विचारतो. प्रश्न ऐकून तिचा अंदाज एकदम बदलतो आणि तावातावात उत्तर देते की, ''पहले फिल्म तो रिलीज होने दो. उसके बाद पूरी कथा लिखूंगी. आउटस्टॅडिंग'. तिने ज्याप्रकारे उत्तर दिलं ते ऐकून फोटोग्राफरही हसू लागतो.

83 च्या प्रीमिअरवेळी आलिया भट्टच्या स्टायलिश लूकची चांगलीच चर्चा होत आहे. यावेळी तिने रणवीर सिंहसोबत फोटोही काढले. स्टेजवर दोघे मस्ती करतानाही दिसले. रणवीर सिंहचा 83 हा सिनेमा २४ डिसेंबरला रिलीज होत आहे. या सिनेमात रणवीर सिंहने कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. तर दीपिकाने यात त्यांची पत्नी रोमी भाटिया यांची छोटीशी भूमिका साकारली आहे. 

टॅग्स :आलिया भट८३ सिनेमा