आलिया भट आणि रणबीर कपूर कामापेक्षा त्यांच्या रिलेशनमुळे चर्चेत आहेत. जवळपास वर्षभरापासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. काही दिवस दोघांनीही आपले नाते जगापासून लपवून ठेवले. पण शेवटी ते जगजाहिर झालेच. तूर्तास आलिया व रणबीर दोघेही एकमेकांसोबत आनंदी आहेत. होय, आलियाने तर रणबीरसाठी खास टॅटू बनवण्याचा निर्णयही घेतला आहे.नुकताच आलियाने आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओ आलिया आणि तिची बेस्ट फ्रेन्ड आकांक्षा अनेक विषयांवर बोलताना दिसत आहेत. अगदी टॅटूबद्दल आणि मुलांबद्दलही. होय, मी भविष्यात कधी टॅटू बनवलाच तर माझ्या शरीरावर ‘8’ चा टॅटू बनवेल, असे आलियाने या व्हिडीओ सांगितले आहे.
आता ‘8’चे रणबीर कपूरशी असलेले कनेक्शन तर तुम्हाला ठाऊक आहेच. होय, रणबीर जेव्हा केव्हा फुटबॉल खेळतो, तेव्हा ‘8’ नंबरची जर्सी घालतो. हेच कारण आहे की, आलिया आपल्या शरीरावर ‘8’ नंबरचा टॅटू गोंदवणार.