Join us

अखेर रणबीर कपूरसोबतच्या त्या ‘सॅड’ फोटोवर बोलली आलिया भट्ट...!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 2:28 PM

गेल्या काही दिवसांपासून आलियाच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लव्ह लाईफचीच अधिक चर्चा होतेय. रणबीर कपूरसोबत असतानाचे तिचे ‘सॅड’ व्हिडीओ आणि फोटोंवरून वेगवेगळे तर्क काढले जात आहे.

ठळक मुद्देमला कुणालाही स्पष्टीकरण द्यायची गरज वाटत नाही. कारण खरे काय, हे फक्त मला ठाऊक आहे आणि त्यामुळे अन्य लोक काय विचार करतात, याने मला काहीही फरक पडत नाही, असे आलियाम्हणाली.

आलिया भट्ट सध्या यशाच्या अत्त्युच्च शिखरावर आहे. ‘राजी’पाठोपाठ आलियाचा नुकताच रिलीज झालेला ‘गली बॉय’ बॉक्स आॅफिसवर बक्कळ कमाई करतोय. पण गेल्या काही दिवसांपासून आलियाच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लव्ह लाईफचीच अधिक चर्चा होतेय. रणबीर कपूरसोबत असतानाचे तिचे ‘सॅड’ व्हिडीओ आणि फोटोंवरून वेगवेगळे तर्क काढले जात आहे. रणबीर व आलियाच्या रिलेशनशिपमध्ये सगळे काही ‘आॅल वेल’ नसल्याचे बोलले जात आहे. अलीकडे आलिया व रणबीरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोत रणबीर फोनमध्ये बिझी होता तर त्याच्या बाजूला आलिया दु:खी, खिन्न चेहरा करून बसलेली होती. हा फोटो पाहून, रणबीरसोबत असताना आलिया इतकी दु:खी का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. तर आता आलियाने स्वत:च या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

होय, डीएनएला दिलेल्या मुलाखतीत आलिया या ‘सॅड’ फोटोवर बोलली. अनेकांनी माझा तो फोटो पाहून, तू इतकी सॅड का असा प्रश्न केला. पण खरे सांगायचे तर मी दु:खी वगैरे अजिबात नव्हते. हा माझा नेहमीचा चेहरा होता. कुठल्या विचारात असले वा कुठल्या गोष्टीवर लक्ष्य केंद्रीत करायची वेळ आली की, माझा चेहरा असाच दु:खी होतो. माझ्या जवळच्या लोकांना हे चांगल्याप्रकारे माहित आहे. अनेकांना हे माहित नाही आणि त्यामुळे माझ्या दु:खी चेह-यावर रोज नव्या कथा रंगवल्या जातात. पण या कथांमध्ये काहीही सत्य नाही, असे आलिया म्हणाली.

मला कुणालाही स्पष्टीकरण द्यायची गरज वाटत नाही. कारण खरे काय, हे फक्त मला ठाऊक आहे आणि त्यामुळे अन्य लोक काय विचार करतात, याने मला काहीही फरक पडत नाही, असेही ती म्हणाली.एकंदर काय तर रणबीरसोबत सगळे काही आॅल वेल असल्याचेच आलियाने सांगितले आहे. आता त्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुम्ही तुमचे ठरवलेले बरे.

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर