बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट सध्या प्रोफेशनल व पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. नुकताच तिला 'राझी' चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तसेच लवकरच तिचा आगामी चित्रपट 'कलंक' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आलिया भट चित्रपटाव्यतिरिक्त रणबीर कपूरसोबत रिलेशनशीप असून त्याच्यासोबत लवकरच लग्नबेडीत अडकणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. ती लवकरच रणबीर बरोबर विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. इतकेच नाही तर एप्रिलमध्ये आलिया रणबीरसोबत रोका सेरेमनी करणार आहे.
रणबीर कपूरसोबतच्या रोका सेरेमनीबाबत वृत्त आलियाने फेटाळून लावले आहे. तिने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मी लंडनच्या एका रेस्टॉरंटमध्ये रोका सेरेमनीसाठी जाणार आहे. पण, ही रोका सेरेमनी माझी नाही. तुम्ही लोक वर्षभरात माझे लग्न लावून द्यायच्या का मागे लागले आहात? लग्न माझ्यासाठी दूरची गोष्ट आहे. सध्या मी कामाच्या व्यापात बिझी आहे. '