Join us

Alia Bhatt नं आई झाल्यानंतर पहिल्यांदाच शेअर केला स्वतःचा फोटो, चाहत्यांची मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 1:23 PM

Alia Bhatt : आलिया भटने आई झाल्यानंतर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे, या फोटोमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी ६ नोव्हेंबर रोजी मुलीचे स्वागत केले. ही बातमी समोर आल्यानंतर केवळ कपूर कुटुंबीयच नाही तर चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला होता. आलिया आणि रणबीरच्या चिमुरडीची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र अद्याप रणबीर-आलियाच्या लेकीची झलक पाहायला मिळाली नाही. दरम्यान, आई झाल्यानंतर पहिल्यांदाच आलिया भटने तिचा पहिला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नुकतीच आई आलिया खूप खुश दिसत आहे.

या फोटोमध्ये आलिया भट पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या स्वेट टीशर्टमध्ये दिसते आहे. या फोटोमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरही आई झाल्यानंतरचा ग्लो दिसत आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "Cozy." आई झाल्यानंतर आलिया भटच्या या पहिल्या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. चाहते या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका युजरने सुंदर आई अशी कमेंट लिहिली आहे. तर दुसऱ्या युजरने आई झाल्यामुळे शुभेच्छा दिल्या.

आलिया भट आणि रणबीर कपूर या वर्षी एप्रिलमध्ये विवाहबद्ध झाले होते. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने आई झाल्याचा आनंद तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला. आलियाने तिची सोनोग्राफी करतानाचा एक फोटो शेअर केला होता आणि लिहिले होते की, तिच्या घरी एक छोटा पाहुणा जन्म घेणार आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर आलिया आणि रणबीर शेवटचे ब्रह्मास्त्र चित्रपटात झळकले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती.

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर