बॉलिवूडची क्युट गर्ल आलिया भट बऱ्याचदा न विचार करता करणाऱ्या विधानामुळे चर्चेत येत असते. मात्र यावेळेस ती कोणत्या विधानामुळे नाही तर तिने भर कार्यक्रमात शिवी घातली. त्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं आहे.
जिओ मामि फिल्म फेस्टिव्हल २०१९मध्ये करीना कपूर खान व आलिया भटने स्पेशल सेगमेंटमध्ये करण जोहरने बऱ्याच मुद्द्यांवर वक्तव्य केले. आलिया व करीना या दोघींनी एकमेकांचे कौतूक केलं. या इव्हेंट दरम्यान एक वेळ अशी आली जेव्हा आलियाच्या तोंडून शिवी निघाली.
करीना म्हणाली की, हे काय होत आहे. मस्करीत करण म्हणाला की, मी तुला असं मोठे केले आहे. आलियाने सांगितले की, जेव्हा तुम्ही भावनिक होता तेव्हा तूम्ही वहावत जातात.
यावर मज्जा घेत करीना म्हणाली की, तुम्ही पाहू शकता की ही हल्लीची पिढी कशी आहे.