‘स्टुडंट ऑफ द इयर २’ चित्रपटातून दिग्दर्शक करण जोहरने अभिनेत्री आलिया भट्ट हिला लाँच केले. तिच्या टॅलेंट आणि अभिनयाच्या जोरावर तिने विविध चित्रपट केले. या सर्व चित्रपटांमध्ये तिने वेगवेगळया भूमिका साकारल्या. ‘हायवे’,‘कपूर अॅण्ड सन्स’,‘कलंक’ यासारख्या अनेक चित्रपटातून तिने तिचे कौशल्य सिद्ध केले. राजस्थान पत्रिकाच्या माहितीनुसार आलियाला हॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा आहे. यासाठी तिने तयारीसुद्धा सुरु केली आहे.
काही दिवसांपूर्वीच आलियाला तिची बेस्टफ्रेंड आकांशा रंजन कपूरसोबत लॉस एंजेलिसमध्ये पाहण्यात आले. फॅन्सना वाटेल आलिया तिकडे व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेली आहे. मात्र रिपोर्टनुसार आलिया इंटरनॅशनल सेलिब्रेटी एजेंटच्या शोधात तिकडे गेली होती. याआधी ऐश्वर्या राय, बिपाशा बासूने आणि प्रियंका चोप्रानेसुद्धा एजेंट नियुक्त केले आहेत. एजेंट्स त्यांना हॉलिवूडमध्ये होत असलेल्या इव्हेंट आणि सिनेमांबाबत माहिती देतात.