Join us

काय म्हणता? रणबीर कपूरच्या फोनच्या वेडापायी आलिया भट्ट त्रस्त?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 3:29 PM

होय, रणबीर व आलियाचा एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. आता या फोटोत आलिया व रणबीर एकमेकांशेजारी बसलेले आहेत. पण...

ठळक मुद्देहा फोटो ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवरचा असल्याचे कळते. ‘ब्रह्मास्त्र’मध्ये आलिया व रणबीर पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. अद्याप दोघांनीही आपले नाते अधिकृत केले नाही. पण गेल्या काही दिवसांत हे नाते कुणापासूनही लपलेले नाही. दोघेही लवकरच लग्न करणार, अशीही चर्चा आहे.

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. सध्या हे कथित कपल एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहे. होय, रणबीर व आलियाचा एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. आता या फोटोत आलिया व रणबीर एकमेकांशेजारी बसलेले आहेत. पण रणबीर आपल्या फोनमध्ये व्यस्त आहे आणि आलिया त्याच्या बाजूला चेहरा पाडून शून्यात बघते आहे. आता असे का, हे मात्र आम्हाला ठाऊक नाही. रणबीरच्या फोनच्या वेड्यापायी आलिया नाराज आहे की शूटींगमुळे थकली आहे, हे कळायला मार्ग नाही.

हा फोटो ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवरचा असल्याचे कळते. ‘ब्रह्मास्त्र’मध्ये आलिया व रणबीर पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. याच चित्रपटाच्या सेटवर आलिया व रणबीर एकमेकांत गुंतल्याचे म्हटले जाते. अद्याप दोघांनीही आपले नाते अधिकृत केले नाही. पण गेल्या काही दिवसांत हे नाते कुणापासूनही लपलेले नाही. दोघेही लवकरच लग्न करणार, अशीही चर्चा आहे. दोघांचाही एकमेकांच्या कुटुंबासोबत खूप चांगला बॉन्ड आहे. आलिया अनेकदा रणबीरची मॉम नीतू कपूर यांच्यासोबत दिसली आहे. रणबीरची बहीण रिद्धिमा हिच्यासोबतही आलिया दिसली आहे. रणबीरही अर्ध्या रात्री आलियाचे डॅड महेश भट्ट यांच्यासोबत दिसला आहे. आलियाची आई सोनी राजदान ही सुद्धा रणबीरची फॅन आहे. नीतू सिंग व सोनी राजदान या दोघींनी अलीकडे रणबीरचा ‘संजू’ हा चित्रपट एकत्र पाहिला होता. या साऱ्या गोष्टी आलिया व रणबीरआपल्या नात्याबद्दल गंभीर आहेत, याकडे इशारा करणा-या आहेत.

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भट