Join us

आलिया भट्टचं 'वेक अप सीड'साठीचं ऑडिशन पाहिलं का? १४ वर्षांपूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 5:29 PM

१४ वर्षांपूर्वी आलिया भटने 'वेक अप सीड' चित्रपटासाठी ऑडिशन दिलं होतं. ऑडिशनचा थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होतोय. 

अभिनेत्री आलिया भट्ट बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकतेच 'हार्ट ऑफ स्टोन' या सिनेमातून तिने हॉलिवूडमध्येही पदार्पण केलं. ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळं नेहमीच चर्चेत असते. तिच्या खासगी आयुष्यात अनेक घडामोडी घडत असताना, तिचे अनेक चित्रपटही आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यातच आलिया भटचा एक व्हिडीओ समोर आला आहे. १४ वर्षांपूर्वी आलिया भटने  'वेक अप सीड' चित्रपटासाठी ऑडिशन दिलं होतं. ऑडिशनचा थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होतोय. 

ऑडिशन व्हिडीओमध्ये आलिया काही डायलॉग बोलताना दिसते आहे. आलिया ब्लॅक अँड व्हाइट टॉप आणि जीन्समध्ये ती क्यूट दिसत आहे. 2009 मध्ये आलियाने 'वेक अप सिड' चित्रपटातील आयशाच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते. पण, काही कारणांमुळे ही भूमिका कोंकणा सेन शर्माकडे गेली. अयान मुखर्जी दिग्दर्शित वेक अप सीड सिनेमा २००९ मध्ये १४ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या सिनेमात रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत होता. त्यावेळी रणबीर २७ वर्षांचा तर आलिया १६ वर्षांची होती.  हा व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिला जात आहे.

आलिया नेहमीच रणबीर कपूरची चाहती राहिली आहे. तो तिचा क्रश असल्याचं तिने अनेकदा कबूल केलं.  'ब्रह्मास्त्र' या त्यांच्या पहिल्या चित्रपटामुळे दोघे जवळ आले. येथूनचं त्यांच्यात प्रेम फुललं आणि एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. अगदी फेअरीटेल वाटावी अशी त्यांची लव्हस्टोरी आहे. गेल्याच वर्षी आलियाने लेक राहालाही जन्म दिला.

आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती सध्या तिच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 28 जुलैला रिलीज झालेला हा सिनेमा चांगली कमाई करत आहे. या चित्रपटात ती रणवीर सिंगसोबत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तर आलियाचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'जिगरा' असे या चित्रपटाचे नाव आहे.  या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूकही समोर आला आहे.  या चित्रपटात करण जोहर आणि आलिया भट्ट पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. दोघे मिळून चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तर वासन बाला या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

 

टॅग्स :आलिया भटबॉलिवूडरणबीर कपूरसिनेमा