आलिया भट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन यांचा ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ हा चित्रपट सगळ्यांना आठवतच असेल. 2012 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने तरुणाईला वेड लावलं होतं. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया भट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकले होते. नुकतचं या चित्रपटाला 11 वर्ष पूर्ण झाली आहे. डेब्यू चित्रपटाला 11 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आलिया, वरुण आणि सिद्धार्थने आनंद व्यक्त केला.
आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर फ्रॉस्टेड ग्लासवर 11 नंबर लिहून एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच तिने एक छोटीशी नोटही शेअर केली आहे. तिनं लिहिलं, '11 वर्षे..., वेळ कसा उडत जातो'.
बॉलिवूडमध्ये 11 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वरुण धवनने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याला 'बवाल' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळत असल्याचे दिसत आहे. यासोबतच त्याने नोटमध्ये लिहिले की, "सिनेसृष्टीत 11 वर्षे पूर्ण केल्याच्या दिवशी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे".
सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर काही फॅन पोस्ट देखील शेअर केल्या आहेत.