आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे कपल सध्या जाम चर्चेत आहे. इतके की, दोघांच्या लग्नाचीही चर्चा आहे. पण तूर्तास एक वेगळीच चर्चा रंगतेय. होय, आलिया व रणबीरमध्ये फार काही ‘आॅल वेल’ नाही, असे मानले जात आहे आणि याला कारण आहे, खुद्द आलिया.होय, चर्चा खरी मानाल तर आलियाच्या एका स्वभावामुळे रणबीर अस्वस्थ आहे. आलिया रणबीरला एक क्षणही एकटे सोडायला तयार नाही. रणबीर जरा का नजरेआड झाला की, ती त्याला सतत फोन करते. एका पाठोपाठ एक मॅसेज करत सुटते. आलियाच्या या अशा वागण्याने रणबीरला वैताग आणला आहे. गेल्या काही दिवसांपासून या मुद्यावरून दोघांमध्ये मतभेद वाढल्याचे मानले जात आहे. काहींच्या मते, रणबीर हे नाते फार गंभीरपणे घेत नसल्याचे आलियाला जाणवू लागले आहे. यावरूनही दोघांत खटके उडत आहेत.
काल रात्री ‘उमंग अवार्ड’दरम्यानही आलिया व रणबीर यांच्यात काहीतरी बिनसल्याचे दिसले. या सोहळ्यात दोघांनीही एकत्र एन्ट्री घेतली खरी पण दोघेही एकमेकांपासून फटकून वागताना दिसले. यादरम्यानचे दोघांचे फोटो पाहून अनेकांनी रणबीरच्या चेहºयावरची नाराजी नोटीस केली. आलियाही कमालीची नाराज दिसली. कॅमेरे बघून दोघांनीही मीडियाला इग्नोर करणे सुरु केले. या सगळ्यामुळे आलिया व रणबीरमध्ये सगळे काही ठीक नसल्याच्या चर्चांना पुन्हा जोर चढला.
आता या चर्चेत किती तथ्य आहे, हे येणारा काळचं सांगेल. पण तूर्तास तरी आलिया व रणबीर दोघांनाही आपल्या चेह-यावरची नाराजी लपता लपवता येत नाहीये,असेच दिसतेय. आलिया व रणबीर सध्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात बिझी आहे. याच चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम फुलले.