Join us

PHOTOS: निहारिका कोनिडेलाच्या लग्नात फॅमिलीसोबत प्रायव्हेट जेटने पोहोचला अल्लू अर्जुन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 15:04 IST

निहारिका आणि चैतन्य ९ डिसेंबरला लग्न करणार आहे आणि सोमवारीच ते उदयपुरला पोहोचले. मंगळवारी मेंहदी सेरेमनीनंतर संगीत फंक्शन असणार आहे

तेलुगू अभिनेत्री निहारिका कोनिडेला आणि चैतन्य जोनालगाडा उदयपुरच्या उदय विलास पॅलेसमध्ये शानदार डेस्टिनेशन वेडींग करणार आहे. या लग्नाला तेलुगू सिने इंडस्ट्रीतील सर्वच मोठे स्टार पोहोचले आहेत. या लग्नात सहभागी होण्यासाठी सुपरस्टार अल्लू अर्जुन फॅमिलीसोबत एका प्रायव्हेट जेटने उदयपुर पोहोचलाय. त्याचे  काही खास फोटो समोर आले आहेत. 

निहारिका आणि चैतन्य ९ डिसेंबरला लग्न करणार आहे आणि सोमवारीच ते उदयपुरला पोहोचले. मंगळवारी मेंहदी सेरेमनीनंतर संगीत फंक्शन असणार आहे. बुधवारी लग्नानंतर निहारिका आणि चैतन्य हैद्राबादसाठी त्यांच्या प्रायव्हेट जेटने परत जातील. उदयपुरला पोहोचताच अल्लू अर्जुनने पत्नी स्नेहा रेड्डी, मुले अयान, आरा आणि पॅरेंट्ससोबत फोटो शेअर केले. 

या लग्नाला केवळ अल्लू अर्जुनच्याच नाही तर तेलुगूतील इंडस्ट्रीतील सर्वच मोठे स्टार फॅमिलीसोबत पोहोचले आहेत. या लग्नासाठी आलेल्या रामचरण आणि चिंरजीवीचेही फोटो समोर आले होते. रितु वर्मा आणि लवन्या त्रिपाठी यांनीही  फोटो शेअर केले आहेत. लग्नाला आलेल्या काही स्टार्स फोटो समोर आले आहेत. पण निहारिका आणि चैतन्यचे फोटो अजून समोर आले आहे. 

 

टॅग्स :अल्लू अर्जुनTollywood