Join us

सलमान, शाहरुखला सोडलं मागे, 'हा' अभिनेता ठरला देशातला सर्वात महागडा स्टार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 12:45 IST

कोण आहे सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ? हे जाणून घेऊया.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक सुपरस्टार आहेत. पण, भारतीय चित्रपटसृष्टी सर्वात जास्त चर्चा अभिनेता सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान या तिघांची असायची. गेली बरीच वर्षं सलमान, शाहरुख आणि आमिर अशा तीन खानचं  भारतीय चित्रपटसृष्टीवर वर्चस्व होतं. सलमान, शाहरुख आणि आमिर खान हे भारतातले सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेते होते. आता यांना मागे टाकत एका दाक्षिणात्य अभिनेत्याचं नाव समोर आलं आहे. बॉलिवूडच्या सुपरस्टार्सना मागे टाकत दाक्षिणात्य अभिनेता हा भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे. 

सलमान, शाहरुख आणि आमिर खान यांना मागे टाकणारा अभिनेता ठरला आहे अल्लू अर्जून ( Allu Arjun India’s Highest-paid Actor). 'पुष्पा २' प्रदर्शित झाल्यापासून अल्लू अर्जुनची लोकप्रियता खूप वाढली आहे. सध्या अल्लू अर्जून अ‍ॅटली कुमारसोबतच्या 'ए६' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटासाठी त्याने मोठी रक्कम आकारली आहे. इन्स्टंट बॉलिवूडच्या पोस्टनुसार, अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी १७५ कोटी रुपये घेतले आहेत. यासह, तो भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे.

 

अल्लू अर्जुन हा फक्त एक अभिनेता नाही तर, तो एक निर्माता आणि उद्योजक देखील आहे. विविध ठिकाणच्या गुंतवणुकीतून तो प्रचंड कमाई करतो.  लग्झरी लाईफस्टाईलची आवड असलेल्या अल्लूकडं प्रायव्हेट जेट, अलिशान बंगला, तसंच अनेक महागड्या प्रॉपर्टी आहेत. अल्लूला कारची विशेष आवड असून त्याचं स्वत:चं कारचं कलेक्शन आहे.  त्याची एकूण संपत्ती अंदाजे ४६० कोटी रुपये आहे.  'पुष्पा २: द रुल'नंतर तो देशातील सर्वात जास्त मागणी असलेल्या स्टारपैकी एक बनला आहे.  'स्टायलिश स्टार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल्लू अर्जुनचा जगभरात चाहतावर्ग आहे.

टॅग्स :अल्लू अर्जुनसलमान खानआमिर खानशाहरुख खान