Join us  

6 व्या आठवड्यातही ‘Pushpa’चाच धुमाकूळ! अल्लू अर्जुनच्या या सिनेमानं ‘बाहुबली’लाही मागे टाकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 11:07 AM

Pushpa Box Office Collection: भारतातच नव्हे तर जगभरात केवळ पुष्पाचीच चर्चा; एक नवा विक्रम रचला

Pushpa Box Office Collection: कोरोना काळातही अल्लू अर्जुनच्या  (Allu Arjun) ‘पुष्पा’ (Pushpa The Rise) या चित्रपटाने बॉक्स बॉक्स ऑफिसवर धमाका केला. होय, एकीकडे कोरोनामुळे चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहे. पण अल्लूचा ‘पुष्पा’ अजूनही थिएटरमध्ये आहे आणि बंपर कमाईही करतोय. भारतातच नव्हे तर विदेशातही धुमाकूळ घालणाऱ्या या सिनेमानं ‘बाहुबली’चा (Bahubali: The Conclusion) रेकॉर्डही मोडीस काढला आहे.

17 डिसेंबरला हा सिनेमा तेलगू आणि हिंदी भाषेत रिलीज झाला होता. तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेतही तो डब करण्यात आला होता. याचाच परिणाम म्हणजे, सहाव्या आठवड्यात या चित्रपटाने 6 कोटींची कमाई करत, प्रभासच्या ‘बाहुबली’सह अनेक बॉलिवूड सिनेमांचा विक्रम मोडीत काढत एक नवा विक्रम रचला आहे.

नवा विक्रमसहाव्या आठवड्यात ‘पुष्पा’ने 6 कोटींची कमाई केली. सहाव्या आठवड्यात ‘बाहुबली’ने 5.38 कोटींची कमाई केली होती. हा एक नवा विक्रम आहे.‘पुष्पा’च्या हिंदी व्हर्जनने आत्तापर्यंत 100 कोटींची कमाई केली आहे आणि जगभरात 350 कोटींचा आकडा गाठला आहे. येणाºया आणखी काही दिवसांत ‘पुष्पा’ला चित्रपटात कोणताही प्रतिस्पर्धी नाही. त्यामुळे येत्या दिवसांत हा सिनेमा आणखी अनेक विक्रम मोडणार, असं चित्र आहे. कोणताही नवा मोठा सिनेमा नसल्याने लोक फक्त ‘पुष्पा’ बघत आहेत.

‘पुष्पा’ या चित्रपटाची कथा आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना भावला आहे. चित्रपटाची गाणीही लोकांनी डोक्यावर घेतली आहेत. सामी, श्रीवल्ली या गाण्यांवरचे लाखो रिल्स बनत आहेत. अगदी क्रिकेटपटूंपासून बॉलिवूड, टॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वच या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.‘पुष्पा’चा दुसरा पार्ट ‘पुष्पा- द रूल’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एप्रिल महिन्यापासून या चित्रपटाचं शूटींग सुरू होत आहे.

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनबाहुबली