Join us  

या अटीवर बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी तयार आहे Allu Arjun; वाचा काय आहे 'ही' अट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2022 1:37 PM

साउथचा स्टायलिश स्टार म्हणून प्रचलित असलेला अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्याच्या पुष्पा (Pushpa Movie) चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.

साउथचा स्टायलिश स्टार म्हणून प्रचलित असलेला अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्याच्या पुष्पा (Pushpa Movie) चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'पुष्पा' या चित्रपटाची कमाई सुरूच आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवरील कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. पुष्पा लवकरच हिंदी व्हर्जनमध्ये ७५ कोटींचा टप्पा पार करणार आहे. अशा प्रकारे अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ३०० कोटींची कमाई केली आहे.

पुष्पा चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये अल्लू अर्जुनची फॅन फॉलोइंग खूप वाढत आहे. या अभिनेत्याची लोकप्रियता पाहता त्याला हिंदी चित्रपटांच्याही ऑफर्स येत आहेत. मात्र अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना हिंदी चित्रपटात पाहण्यासाठी अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं दिसत आहे. बॉलिवूड चित्रपटांबद्दल बोलताना अल्लू अर्जुनने एका मुलाखतीत सांगितले की, त्याला बॉलिवूडच्या चित्रपटांच्या ऑफर आल्या, परंतु त्यापैकी एकही ऑफर इतकी इंटरेस्टिंग नव्हती ज्यासाठी त्याने लगेच होकार दिला असता.

हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी तयार; पण...अल्लू अर्जुन म्हणतो की तो हिंदी चित्रपटात काम करायला तयार आहे, पण फक्त एक चांगली कथा मिळाली पाहिजे. जेव्हा तो हिंदी स्क्रीप्ट हातात घेतो तेव्हा त्याला कोणत्या अभिनेत्यासाठी दुसरी भूमिका करणे फारसे रुचत नाही. अल्लू अर्जुन म्हणतो की, नायक म्हणून त्याला नेहमीच मुख्य भूमिका साकारायची होती.

चाहत्यांमध्ये वाढतेय क्रेझपुष्पाची प्रचंड कमाई पाहता साउथचे चित्रपट बॉलिवूडपेक्षा चांगली कमाई करत आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हिंदी प्रेक्षकांमध्येही दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ वाढत आहे. या चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. त्याच्याकडे पाहता आगामी काळात त्याची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढणार आहे.

टॅग्स :अल्लू अर्जुन