Join us  

झुकेगा नही! अल्लु अर्जुनने शाहरुखची ऑफर नाकारली, Jawan मध्ये 'पुष्पा' चा कॅमिओ नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 11:38 AM

अल्लु अर्जुनने 'जवान'च्या या ऑफरवर विचार करण्यासाठी वेळ घेतला होता.

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) 'पठाण' (Pathaan) सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर आता चर्चा आहे 'जवान' (Jawan) या त्याच्या आगामी चित्रपटाची. 'एटली' (Atlee) यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमासाठी शाहरुख जोरदार मेहनत घेताना दिसतोय. जवानमधील त्याचा लुकही व्हायरल झाला आहे. अशीही एक चर्चा होती की 'पुष्पा' फेम साऊथ अभिनेता अल्लु अर्जुनला (Allu Arjun) जवानमध्ये कॅमिओ रोल ऑफर करण्यात आला होता. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार अल्लु अर्जुनने हा रोल नाकारला आहे. 

'पुष्पा २' मुळे नाकारली ऑफर 

'झुकेगा नही साला' असं म्हणत आपल्या जबरदस्त अॅक्शनने चाहत्यांना जागीच खिळवून ठेवणारा अभिनेता अल्लु अर्जुन सध्या 'पुष्पा २' (Pushpa 2) च्या चित्रिकरणात व्यस्त आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, अल्लु अर्जुन सध्या 'पुष्पा २' साठी कठीण प्रशिक्षण घेत आहे. यामुळेच त्याच्याजवळ इतर कोणत्याच प्रोजेक्टसाठी वेळ नाही. याशिवाय 'पुष्पा २' चे चित्रीकरण वायझॅग आणि हैदराबाद मध्ये वेगाने सुरु आहे.'

अल्लु अर्जुनने 'जवान'च्या या ऑफरवर विचार करण्यासाठी वेळ घेतला होता. मात्र 'पुष्पा २' च्या व्यग्र शेड्युलमुळे ते शक्यच नाहीए. तसेच त्याला 'पुष्पा २' शिवाय बाकी कोणत्याच सिनेमात काम करायचे नाही. त्यामुळे आता अल्लु अर्जुनच्या बॉलिवूड डेब्युसाठी चाहत्यांना आणखी वाट पहावी लागणार आहे.

'पुष्पा २' मध्ये अल्लु अर्जुन शिवाय रश्मिका मंदाना(Rashmika Mandana) आणि फहद फासिल यांची मुख्य भूमिका आहे. याशिवाय अभिनेत्री साई पल्लवीचीही (Sai Pallavi) एंट्री होणार अशी चर्चा आहे. मात्र मेकर्सकडून अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Pushpa 2: 'पुष्पा २' संदर्भात मोठी अपडेट आली समोर, जाणून घ्या याबद्दल

तर दुसरीकडे शाहरुखला 'जवान' सिनेमाकडूनही खूप अपेक्षा आहेत. सिनेमा शाहरुखचा डबल रोल आहे. तर साऊथ अभिनेता विजय सेतुपती (Vijay Setupathi) आणि अभिनेत्री नयनतारा (Nayantara) यांचीही मुख्य भूमिका आहे. याचवर्षी २ जून रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.

टॅग्स :अल्लू अर्जुनशाहरुख खानसिनेमा