Join us  

सुसाट!! अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ची नॉनस्टॉप कमाई, जगभरात कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2022 1:51 PM

Pushpa The Rise Box Office collection : ‘पुष्पा’चा नवा रेकॉर्ड! तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा पाच भाषेत रिलीज झालेला हा सिनेमा  छप्परफाड कमाई करतोय. अद्यापही ही कमाई जारी आहे.

एकीकडे रणवीर सिंगच्या ‘83’ या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असताना दुसरीकडे साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या  (Allu Arjun ) ‘पुष्पा’ (Pushpa: The Rise)  या सिनेमानं कमाईचा रेकॉर्ड केला आहे. होय, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा पाच भाषेत रिलीज झालेला हा सिनेमा  छप्परफाड कमाई करतोय. अद्यापही ही कमाई जारी आहे. जगभरात 300 कोटींची कमाई करत या चित्रपटाने एक नवा रेकॉर्ड केला आहे. भारतात या चित्रपटाने 200 कोटींचा बिझनेस केला आहे.

अलीकडे ‘पुष्पा’च्या मेकर्सनी सक्सेस पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत ‘पुष्पा’ जगभरात 300 कोटींची कमाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. ही अपेक्षा एकदम खरी ठरली आहे. चित्रपटाच्या ऑफिशिअल हँडलवरून 1 जानेवारीला एक ट्विट करण्यात आलं आहे. यात पुष्पाच्या कमाईचा उल्लेख आहे.

‘2021 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट. या चित्रपटाने जवळपास 300 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 2022मध्ये देखील चित्रपट चांगली कमाई करेल अशी आशा आहे,’ असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हिंदी व्हर्जनने 50 कोटींचा टप्पा कधीच ओलांडला

‘पुष्पा’ हिंदीतही प्रदर्शित झाला आहे. रणवीरच्या ‘83’ या सिनेमाकडे पे्रक्षकांनी पाठ फिरवली. पण हिंदीत रिलीज झालेल्या ‘पुष्पा’वर मात्र प्रेक्षकांच्या उड्या पडल्या. ‘पुष्पा’च्या हिंदी व्हर्जनने आत्तापर्यंत 56.69 कोटींची कमाई केली आहे. हा आकडा 75 कोटींचा आकडा पार करेल, असा अंदाज आहे. काल शनिवारी 1 जानेवारीला या चित्रपटाने 6.10 कोटींचा गल्ला जमवला.  ‘पुष्पा’ हा चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा सिनेमा दोन पार्टमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिला पार्ट रिलीज झालाये आणि दुसºया पार्टचं शूटींग या नव्या वर्षात लवकरच सुरू होणार आहे.

टॅग्स :अल्लू अर्जुनTollywood