भारतीय मनोरंजनसृष्टीसाठी काल महत्वाचा दिवस होता. दिल्लीतील विज्ञान भवन येथे ६९ वा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार (National Film Awards) पार पडला. भारतीय सिनेसृ्ष्टीतील अनेक कलाकरांनी हा पुरस्कार पटकावला. दाक्षिणात्य अभिनेता अल्लु अर्जुनला (Allu Arjun) 'पुष्पा' मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि आलिया भटने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. यानिमित्त अल्लु अर्जुनने नुकतीच खास पोस्ट शेअर केली आहे.
अल्लु अर्जुनने वहीदा रहमान, आलिया भट आणि क्रिती सेननसोबत फोटो शेअर केले. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले,"वहीदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारताना पाहणं हा आयुष्यातील सर्वोत्कृष्ट अनुभव होता. सहा दशकांहून अधिक त्यांचं फिल्म इंडस्ट्रीत करिअर राहिलं आहे. खरंच प्रेरणादायी आहे. प्रिय आलिया भटलाही पुरस्कार घेताना पाहून छान वाटलं. आयकॉनिक सिनेमात आयकॉनिक परफॉर्मन्स दिल्याबद्दल तिला हा पुरस्कार मिळायलाच हवा होता. असे अजून मिळतील...तसंच प्रिय क्रिती सेननने दिलेल्या लीग जंपर परफॉर्मन्सबद्दल तिचं अभिनंदन. किती प्रेमळ आहे...तिला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. आणि लवकरच सोबत सिनेमा करु अशी आशा आहे."
पुरस्कार सोहळ्यात अल्लु अर्जुन आणि क्रिती सेनन बाजूला बसले होते. तेव्हा दोघांनी पुष्पाची पोज देत फोटोही काढले. त्यांचा बाँड पाहून चाहत्यांनी एकत्र सिनेमा करा अशा कमेंट केल्या. तर आता खुद्द अल्लु अर्जुननेच क्रिती सेननसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.