Join us  

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'मध्ये होणार या अभिनेत्रीचा धमाकेदार एंट्री, समांथाचा रेकॉर्ड मोडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 11:04 AM

पुष्पा २ सतत चर्चेत आहे. या सिनेमाचा टीझर आऊट झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun)  आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर आगमी सिनेमा पुष्पा २ सतत चर्चेत आहे. या सिनेमाचा टीझर आऊट झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. अल्लु अर्जुन आणि रश्मिका स्टारर या सिनेमाबाबत सतत नव्या अपडेट्स समोर येतायेत. आता अशी माहिती समोर येतेय की या सिनेमात आणखी एका अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार अल्लु अर्जुन आणि रश्मिकाच्या या सिनेमात निर्माते एका खास आयटम साँगचं प्लनिंग करतायेत.  रिपोर्टनुसार अल्लु अर्जुन आणि रश्मिकाच्या पुष्पा प्रमाणेच या सिनेमात ही एक धमाकेदार आयटम साँगचा विचार करतायेत. समांथाच्या उ अंटावावा या गाण्याने रिलीजनंतर धमाका केला होता. अनेक रेकॉर्डस या गाण्याने मोडले होते. हे गाणं फक्त तेलुगूमध्ये नाही तर हिंदीतदेखील सुपरहिट झाले होते. आता निर्माता आणि दिग्दर्शक दुसऱ्या भागात ही असं काहीसं जादू निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. ज्यासाठी दिग्दर्शक सुकुमार यांनी अभिनेत्री श्रीलीला अप्रोच केलं आहे.  

रिपोर्टनुसार श्रीलीलाची तेलुगू इंडस्ट्रितील वाढती लोकप्रियता पाहून निर्मात्यांनी तिला आयटम साँगसाठी कास्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. जर श्रीलीला हे आयटम साँग करण्यासाठी तयार झाली तर पुन्हा एकदा तिचं जादू प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळेलं. अजून याबाबत निर्मात्यांनी कोणताच अधिकृत खुलासा केलेला नाही.  

नव्याने शूट होणार सिनेमा?पहिल्या पार्टची कथा जिथे संपली, तिथून Pushpa 2: The Ruleची कथा सुरू होणार आहे. अर्थात हा सिनेमा कधी रिलीज होतोय, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. चर्चा खरी मानाल तर, आत्तापर्यंत शूट केलेल्या सीन्सबद्दल दिग्दर्शक सुकूमार समाधानी नाहीत. काही सीन्स रिशूट करण्याचा त्यांचा विचार आहे. असं झालं तर ‘पुष्पा 2’चं प्रदर्शन आणखी लांबणार आणि चाहत्यांची प्रतीक्षाही वाढणार. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा (Pushpa: The Rise - Part 1) या चित्रपटानं केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली होती. पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली आणि पुष्पाची केमिस्ट्री, या चित्रपटामधील गाणी, ॲक्शन सीन्सने नुसता धुमाकूळ घातला होता.

टॅग्स :अल्लू अर्जुनरश्मिका मंदाना