Join us

आलोकनाथ यांच्यामुळे रखडले चित्रपटाचे प्रदर्शन! निर्मात्याला मिळता मिळेना वितरक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 3:54 PM

बॉलिवूडचे संस्कारी बाबू आलोक नाथ यांच्या असण्याने चित्रपटाला वितरक मिळणार नाहीत, असे कधी कुण्या निर्मात्यांने कल्पनाही केली नसावी. पण आज नेमकी हिच स्थिती आहे.

ठळक मुद्देविनता नंदा यांनी मीटू मोहिमेअंतर्गत आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी पोस्ट लिहिली होती.

बॉलिवूडचे संस्कारी बाबू आलोक नाथ यांच्या असण्याने चित्रपटाला वितरक मिळणार नाहीत, असे कधी कुण्या निर्मात्यांने कल्पनाही केली नसावी. पण आज नेमकी हिच स्थिती आहे. मीटू मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झेलणाऱ्या आलोक नाथ यांच्यामुळे एका चित्रपटाचे भविष्य टांगणीला लागले आहे. होय, या चित्रपटाचे नाव आहे,‘मैं भी’. ‘मैं भी’ हा चित्रपटही ‘मीटू’ मोहिमेवर आधारित आहे आणि आलोक नाथ या चित्रपटात जजच्या भूमिकेत आहेत. पण नेमक्या याच कारणामुळे या चित्रपटाला वितरक मिळेनासे झाले आहेत. ‘मैं भी’चे निर्माते इमरान खान यामुळे अडचणीत सापडले आहेत.

एका ताज्या मुलाखतीत बोलताना इमरान यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली. ‘आलोक नाथ यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप होण्यापूर्वी आम्ही ‘मैं भी’चे शूटींग सुरु केले होते. जुलै २०१८ मध्ये हा चित्रपट बननू तयार झाला. यानंतर फेबु्रवारी २०१९ पासून मी या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी प्रयत्न करतोय. पण कुठलाही डिस्ट्रिब्युटर आणि पब्लिसिटी पार्टनर या चित्रपटाशी नाव जोडण्यास तयार नाही. आधी अनेक पब्लिसिटी पार्टनर या चित्रपटात पैसे लावण्यासाठी तयार होते. पण आता त्यांनी माघार घेतलीय. वितरकांनीही माझ्या चित्रपटाकडे पाठ फिरवली. यासंदर्भात आम्ही आलोकनाथ यांच्याशी बोलण्याचे प्रयत्न केलेत. पण त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही, असे इमरान खान यांनी सांगितले.आलोकनाथ यांच्यावर आरोप झाल्यानंतर मी हा चित्रपट बनवला असता तर मी समजू शकलो असतो. पण असे नसताना माझ्या चित्रपटाचे प्रदर्शन अडचणीत आलेय. ताज्या ‘दे दे प्यार दे’ कॉन्ट्रोवर्सीने माझ्या अडचणीत आणखी भर घातली. अजय देवगण एक मोठा निर्माता आहे आणि त्याची स्वत:ची डिस्ट्रिब्युशन कंपनी आहे. अशात त्याला काहीही फरक पडणार नाही. पण मी अजय देवगण नाही, असेही ते म्हणाले.तुम्हाला ठाऊक आहेच की, ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात आलोक नाथ यांना घेतल्यावरून अलीकडे अजय देवगणवर टीकेचा भडीमार झाला होता. पण आताश: हे प्रकरण शांत झालेले दिसतेय. 

विनता नंदा यांनी मीटू मोहिमेअंतर्गत आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी पोस्ट लिहिली होती. एका पाटीर्नंतर मी एकटी घरी जात होते. त्यांनी मला लिफ्ट देण्याची आॅफर दिली. मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि कारमध्ये बसले. त्यानंतरचे मला अंधूक आठवते. मला जेव्हा जाग आली तेव्हा मला वेदना होत होत्या. मी बेडवरुन उठू शकले नाही. याबद्दल मी माज्या मित्रांना सांगितले, परंतु सर्वांनी या घटनेला कायमचे विसरुन जाण्याचा सल्ला दिला, असे नंदा यांनी म्हटले होते. केवळ विनता नंदानंतर अन्य काही महिलांनीही आलोक नाथ यांच्यावर गैरतर्वनाचे आरोप केले होते.

टॅग्स :आलोकनाथ