ठळक मुद्देबिग बॉस आणि ‘तौबा तेरा जलवा’ हे चित्रपट सोडले तर अमिषा कोणत्या जाहिरातीमध्ये देखील झळकलेली नाहीये. पण असे असले तरी तिच्याकडे चांगलाच पैसा आहे. सेलिब्रेटी नेटवर्थ या वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, अमिषाकडे ३० दशलक्ष डॉलरहून अधिक पैसा आहे.
‘कहो ना प्यार है’ सिनेमातून अमिषा पटेलने दणक्यात रूपेरी पडद्यावर हृतिकसह एंट्री घेतली होता. हृतिक रोशन आणि अमिषा या दोघांचाही हा पहिला सिनेमा होता. पदार्पणाच्या सिनेमातच दोघांनाही सुपरडुपर यश मिळाले आणि हा सिनेमाही सुपरहिट ठरला होता. अमिषाच्या भूमिकेचे देखील विशेष कौतुक करण्यात आले होते. या सिनेमानंतर मात्र अमिषाची जादू फिकी पडली. नाही म्हणायला गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने उत्तम भूमिका साकारल्या. पण तरीही अमिषाच्या स्टारडमला ओहोटी लागली ती लागलीच... गेल्या काही वर्षांत तर तिला काम मिळणेही बंद झाले. आता अमिषा ‘तौबा तेरा जलवा’ या चित्रपटात झळकणार आहे. तसेच बिग बॉस 13 मध्ये ‘घराची मालकीण’ म्हणून ती काही महिन्यांपूर्वी दिसली होती. पण तिचा बिग बॉसमधील वावर प्रेक्षकांना आवडला नाही.
बिग बॉस आणि ‘तौबा तेरा जलवा’ हे चित्रपट सोडले तर अमिषा कोणत्या जाहिरातीमध्ये देखील झळकलेली नाहीये. पण असे असले तरी तिच्याकडे चांगलाच पैसा आहे. सेलिब्रेटी नेटवर्थ या वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, अमिषाकडे ३० दशलक्ष डॉलरहून अधिक पैसा आहे.
अमिषा चित्रपटात काम करत नसली तरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे ग्लॅमरस आणि हॉट अंदाजातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
खरे तर अमिषाला कहो ना प्यार है आणि गदर एक प्रेमकथा या चित्रपटांना चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. पण या चित्रपटांमुळे मिळालेले स्टारडम तिला सांभाळता आले नाही. त्याकाळात अमिषाने ‘सिलेक्टीव्ह’ होण्याऐवजी एकापाठोपाठ एक डझनभर सिनेमे साईन केलेत. यातले बहुतेक सिनेमे आपटले आणि अमिषाच्या करिअरची नौका डळमळू लागली. या झटक्यातून सावरायला तिला तीन वर्षं लागली. २००६ मध्ये अब्बास मस्तानच्या ‘हमराज’ने तिच्या करिअरला काहीसा आधार दिला. पण तोपर्यंत अमिषाचे स्टारडम संपले होते.