साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री अमला पॉल (Amla Paul) आई झाली आहे. अमला पॉलने ५ नोव्हेंबर २०२३ रोजी बॉयफ्रेंड जगत देसाई याच्याशी लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता लग्नाच्या सात महिन्यांनंतर या अभिनेत्रीने बाळाला जन्म दिला आहे. अमलाच्या पतीने एक सुंदर व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केली आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
अमलाने ११ जून २०२४ रोजी गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अमलाला मुलाला झाला असून त्यांनी त्याच नाव हे 'इलाई' असं ठेवलं आहे. अमलाच्या पतीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुंदर सजावट पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर चाहते आणि सेलिब्रिटींनी कमेंट्स करून या जोडप्याचं अभिनंदन केलं आहे.
अमला पॉल आणि जगत देसाई यांचं लग्न कोची बोलगट्टी येथे झालं होतं. या कपलचा शाही लग्नसोहळा पार पडला होता. कोचीमध्ये या कपलने लव्हेंडर थीमवर ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केलं होतं. अमलाच्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अमलाचं हे दुसरं लग्न होतं. अमलाने तमिळ, मल्याळम आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमला पॉलने या वर्षाच्या सुरुवातीला अजय देवगणच्या 'भोला' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
अमलाचे पहिले लग्न तमिळ दिग्दर्शक एएल विजयशी झाले होते, पण तीन वर्षांच्या संसारानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. २०१४ मध्ये या जोडप्याने लग्न केलं आणि काही गैरसमजांमुळे २०१७ मध्ये त्यांच्या घटस्फोट झाला. धनुषमुळे या दोघांचा घटस्फोट झाल्याचा आरोप तिच्या सासऱ्यांनी केला होता, पण अमलाने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.