रंगभूमीवर नाट्य रसिकांच्या पसंतीस पात्र ठरलेलं नाटक म्हणजे ‘अमर फोटो स्टुडिओ’. सर्वसामान्यांसह तरुणाईला नाट्यगृहाकडे आकर्षित करण्यात हे नाटक यशस्वी ठरलं. तरुणाईला भावणाऱ्या या नाटकाचे दोनशेहून अधिक यशस्वी प्रयोग झाले आहेत. अमेय वाघ, सुव्रत जोशी, सिद्धेश पूरकर, पर्ण पेठे आणि पूजा ठोंबरे अशी तगडी स्टारकास्ट या नाटकातून रसिकांचं मनोरंजन करत आहे. या नाटकात सखी गोखले महत्त्वाची भूमिका बजावत होती. पण सखी पुढील शिक्षणासाठी लंडनला गेली असल्याने तिला या नाटकाला रामराम ठोकावे लागला. नाटकातून एक्झिट घेत असले तरी हे नाटक नावाप्रमाणे ‘अमर’ राहणार आहे असं सखीने म्हटले आहे. या नाटकातून नाइलाजाने बाहेर पडत असले तरी हे नाटक सुरु रहावं अशी इच्छा तिने हे नाटक सोडताना व्यक्त केली होती. तिची जागा आता पर्णने घेतली आहे. या नाटकाचे सध्या जोरदार प्रयोग सुरू आहेत. या प्रयोगातील येणारे काही पैसे या टीमने केरळमधील पुरग्रस्तांना देण्याचे ठरवले आहेत.
'कलाकारखाना' आणि 'सुबक' नाट्य संस्थेला सामाजिक जबाबदारीचे तितकेच भान आहे आणि म्हणूनच 'अमर फोटो स्टुडिओ'ने त्यांच्या नाटकांचे ठाणे आणि बोरिवली मधील प्रयोग हे महापुरामुळे बाधित झालेल्या केरळमधील जनतेला मदत करण्यासाठी आयोजित केले होते. "'Chief Minister Relief Fund' for Kerala" योजनेचा आपण ही एक भाग व्हावे आणि त्याचबरोबर या चांगल्या मोहिमेत आपला सहभाग असावा म्हणून या दोन प्रयोगांच्या उत्पन्नात थोडी भर घालून एक लाख एक हजार एक रुपयांची आर्थिक मदत योजनेसाठी मुख्यमंत्री यांना देऊ केली. अमर फोटो स्टुडिओ टीमने मुख्यमंत्र्यांची नुकतीच मंत्रालयात भेट घेतली.
पेठेने सोशल मीडियाद्वारे या नाटकातील तिच्या एंट्रीबद्दल सांगितले होते. नाटकाचे पोस्टर शेअर करत तिने म्हटले होते की, ''प्रत्येक नाटकाचा प्रवास हा मला अंतरबाह्य बदलवणारा ठरला आहे. हा नवा प्रवास सुद्धा याला अपवाद नसेल! एकाचवेळी पोटात गोळा आणणारं, नवीन जबाबदारी देणारं आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड उत्साह देणारं असे माझं नवं नाटक आहे.