गजब बेज्जती... 'लायगर'ला माईक टायसनचा 'ठोसा'; सिनेमाबद्दल काय म्हणाला बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 11:54 AM2022-09-01T11:54:10+5:302022-09-01T11:55:16+5:30

Mike Tyson cameo In Liger: 'लायगर' रिलीज होऊन एक आठवडाही झालेला नाही आणि चित्रपट थंड बस्त्यात गेल्याची चर्चा आहे. एक जुना व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये माइक टायसन सांगत आहेत की, त्यांना हा चित्रपट आठवत नाही.

Amazing bejjati... Mike Tyson's 'punch' to 'Liger'; See what he said about the movie! | गजब बेज्जती... 'लायगर'ला माईक टायसनचा 'ठोसा'; सिनेमाबद्दल काय म्हणाला बघा!

गजब बेज्जती... 'लायगर'ला माईक टायसनचा 'ठोसा'; सिनेमाबद्दल काय म्हणाला बघा!

googlenewsNext

साउथ स्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) यांचा बहुचर्चित चित्रपट 'लायगर' (Ligar Movie) रिलीज होऊन एक आठवडाही उलटलेला नसतानाही हा चित्रपटात थंड बस्त्यात गेला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते एकमेकांच्या गळ्यात गळे घालून मोठमोठ्या गोष्टी करत होते. मात्र आता चित्रपट फ्लॉप झाल्यावर त्यांच्यातील मतभेदाची चर्चा मीडियामध्ये रंगली आहे. हे इथपर्यंतच थांबलं नाही तर माजी वर्ल्ड बॉक्सर चॅम्पियन माइक टायसन(Mike Tyson)ला चित्रपटात स्पेशल भूमिकेसाठी घेतले होते. मात्र तोदेखील हा चित्रपट विसरून गेला आहे. जिथे त्याने या चित्रपटात काम करण्यासाठी २५ कोटी रुपये मानधन घेतले आहे.

अमेरिकन चॅम्पियन बॉक्सर माइक टायसनला चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये दिसण्यासाठी निर्मात्यांनी २५ कोटी रुपये दिले असल्याचे वृत्त आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये अभिनेता विजय देवरकोंडाने माईक टायसनला ज्याप्रकारे विनोदी पद्धतीने मारहाण करताना दाखवले होते, त्यावर सर्वच चित्रपट समीक्षकांनी टीका केली आहे. टायसनला पाहून प्रेक्षकांनाही आनंद झाला नाही. खरं तर, निर्मात्यांना असे वाटले की चित्रपटात माईक टायसन असल्यास, प्रेक्षकांना हा अनुभव मौल्यवान वाटेल. पण तसे झाले नाही. विशेष म्हणजे २५ कोटी घेतलेल्या माईक टायसनचा गेल्या वर्षीचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पॉडकास्टसाठी रेकॉर्डिंग करत आहे. बॉलिवूडच्या लायगर चित्रपटात नुकतेच काम केले आहे, त्यावर काय सांगाल? तर माईक म्हणताना दिसतो की लायगर. मला काही आठवत नाही. मला आठवण करून द्या. त्याच वेळी, तो एक विचित्र शब्द उच्चारताना दिसतोय.


या व्हिडिओनंतर लायगरच्या निर्माता-दिग्दर्शकामध्येही या मुद्द्यावर कोणताही करार झाला नसल्याच्या बातम्या येत आहेत. बातमीनुसार, दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी खूप दबाव आणल्यानंतर निर्माता करण जोहरने माइक टायसनला क्लायमॅक्समध्ये घेण्यास होकार दिला. करणला सुरुवातीपासूनच विश्वास होता की टायसन या चित्रपटात असल्यामुळे काही फरक पडणार नाही. त्यामुळेच माईक टायसनला लायगरमध्ये घेण्यास त्यांचा विरोध होता.  अभिनेता विजय देवरकोंडा यांनीही पुरी जगन्नाथ यांना सांगितले की, आम्हाला बॉलिवूड चित्रपटात टायसनची गरज नाही. पण पुरी जगन्नाथ यांना मान्य नव्हते. पुरी जगन्नाथ यांच्या आग्रहामुळे निर्मात्यांचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

 

Web Title: Amazing bejjati... Mike Tyson's 'punch' to 'Liger'; See what he said about the movie!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.