Join us

IMDB २०२१ च्या टॉप चित्रपटांच्या यादीत 'जय भीम' पहिल्या क्रमांकावर; सूर्या म्हणाला,"मला अभिमान..."  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 1:20 PM

IMDB नं जारी केली २०२१ मधल्या टॉप रेटेड चित्रपटांची यादी.

आयएमडीबी (www.imdb.com) चित्रपट, टीव्ही शो आणि प्रसिद्ध व्यक्तींच्याबाबत माहिती मिळवण्याच्या जगातील लोकप्रिय स्त्रोत आहे. IMDB नं २०२१ च्या टॉप रेटेड चित्रपटांची यादी जारी केली आहे. यामध्ये दक्षिणेच्या सुपरस्टार सूर्या याचा चित्रपट 'जय भीम' (Jai Bhim) हा टॉपवर आहे. IMDB चा चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर जय भीम, त्यानंतर शेरशाह, सूर्यवंशी, मास्टर, सरदार उधम, मिमी, कर्णन, शिद्दत, दृश्यम २, हसीन दिलरुबा या चित्रपटांचा समावेश करण्यात आलाय.IMDB च्या यादीत जय भीम चित्रपटाला प्रथम स्थान मिळाल्यावर सूर्यानं आपला आनंद व्यक्त केला. "एक अभिनेता आणि निर्मात्याच्या रूपात अनेकदा तुमच्यासोबत अशा घटना घडतात ज्यामुळे तुम्ही थक्क होता. जय भीम हा माझ्यासाठी एक निराळा अनुभव होता. त्या चित्रपटाचा भाग बनून मला अभिमान वाटत आहे. यात इमोशन्स आणि ड्रामा याचा उत्तम ताळमेळ साधला असून आपल्या समोर असलेली बंधनं आणि सामाजिक परिवर्तनाची कथा सांगण्यात आली आहे. सर्वच स्तरातून, समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून मिळणारं प्रेम पाहून आनंद होतो," असं सूर्या म्हणाला."प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या IMDB च्या टॉप रेडेट मुव्हीज २०२१ च्या यादीत या चित्रपटाचा समावेश झाल्याचा आनंद आहे. मी आमचे शुभचिंतक, प्रक्षेक यांचे मत दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. जय भीम हा चित्रपट २४० पेक्षा अधिक देश आणि क्षेत्रांपर्यंत पोहोचवल्याबद्दल सर्वांचे आभार," असंही तो म्हणाला.

दमदार परफॉर्मन्सअमेझॉनवर तामिळ सुपरस्टार सूर्याची प्रमुख भूमिका असलेला ‘जय भीम’ चित्रपट रसिकांच्या भेटीला आलाय. याची जोरदार चर्चा रंगत असल्याचे अद्यापही पाहायला मिळत आहे. अभिनेता सूर्यानं पुन्हा एकदा दमदार परफॉर्मन्स दिला असून सत्य घटनांवर या चित्रपटानं प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटात ज्वलंत विषयावर थेट भाष्य करण्यात आलं आहे. 

टॅग्स :अ‍ॅमेझॉन