‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. गेल्या दीड वर्षांपासून अमीषा कोणत्याही सिनेमात झळकली नाही. अमीषाचे फिल्मी करिअर संपले, असे यामुळे तुम्ही म्हणत असाल तर ते चूक आहे. कारण अमीषा स्वत: हे मानायला तयार नाही. दीड-दोन वर्षांचा ब्रेक तर शाहरूख-आमीरही घेतात, मग मी घेतला तर बिघडले कुठे? असा तिचा सवाल आहे.
रविवारी भोपाळ येथे मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना अमीषा बेधडक बोलली. दीर्घकाळापासून तू सिनेमात दिसली नाहीस, याचे कारण विचारले असता मात्र ती बिथरली. ‘2018 मध्ये मी सनी देओलसोबत एक सिनेमा केला होता. त्यामुळे उण्यापु-या दीड वर्षांपासून मी सिनेमांपासून दूर आहे. इतका गॅप तर आमीर खान, शाहरूख खानही घेतात,’ असे ती म्हणाली.
चित्रपटांपासून दूर राहून मी प्रॉडक्शनच्या टेक्निक शिकले, असेही तिने सांगितले. अमीषाचा आगामी सिनेमा ‘देसी मॅजिक’ आहे. यात ती डबल रोलमध्ये दिसणार आहे. याशिवाय द ग्रेट इंडियन कसीनो आणि तोबा तेरा जलवा हे दोन सिनेमेही तिच्याजवळ आहेत.खरे तर अमिषाला कहो ना प्यार है आणि गदर एक प्रेमकथा या चित्रपटांना चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. पण या चित्रपटांमुळे मिळालेले स्टारडम तिला सांभाळता आले नाही.
त्याकाळात अमिषाने ‘सिलेक्टीव्ह’ होण्याऐवजी एकापाठोपाठ एक डझनभर सिनेमे साईन केलेत. यातले बहुतेक सिनेमे आपटले आणि अमिषाच्या करिअरची नौका डळमळू लागली. या झटक्यातून सावरायला तिला तीन वर्षं लागली. 2006 मध्ये अब्बास मस्तानच्या ‘हमराज’ने तिच्या करिअरला काहीसा आधार दिला. पण तोपर्यंत अमिषाचे स्टारडम संपले होते. 2018 साली ‘भैयाजी सुपरहिट’ हा तिचा सिनेमा रिलीज झाला. पण हा सिनेमाही दणकून आपटला.